Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शनिवार, ३१ जानेवारी, २०२६

विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित - पोपटशेठ यादव

 विकासाच्या जोरावर महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित - पोपटशेठ यादव




विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर चोपडी गटात महायुतीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद 



सांगोला (प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असून सर्वसामान्य जनतेच्या समस्या व अडचणी सोडविण्याचे काम महायुतीने प्रत्यक्ष कृतीतून केले आहे. पाणी, रस्ते, वीज यांसारख्या मूलभूत प्रश्नांसह विविध विकासकामांच्या जोरावर चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचाच झेंडा फडकेल. “सांगोल्याचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. जनतेच्या विश्वासावर, केलेल्या कामांवर आणि विकासाच्या भक्कम पायावरच चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित आहे,” असा ठाम विश्वास शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केला.

       महायुतीच्या निवडणूक प्रचारादरम्यान बोलताना शिवसेना नेते पोपटशेठ यादव म्हणाले की, सांगोल्याचे पाणीदार माजी आमदार शहाजीबापू पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात विकासाची गंगा वाहत आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पाणी प्रश्न मार्गी लागले असून, गावोगावी जलजीवन मिशन, नळ पाणीपुरवठा योजना आणि विकासकामांना गती देण्यात आली आहे. चोपडी गटातील अंतर्गत रस्ते, शेतरस्ते व दळणवळणाच्या सोयीसाठी कोट्यवधींची कामे मार्गी लावण्यात आली. पावसाळ्यात होणाऱ्या गैरसोयी दूर करण्यासाठी सिमेंट रस्ते, पुलांची कामे आणि दुरुस्ती प्रकल्प राबविण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी नवीन ट्रान्सफॉर्मर, वीज लाईन दुरुस्ती आणि शेतीसाठी वीजपुरवठा या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.

        आरोग्य, शिक्षण, महिला सशक्तीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महायुतीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. केवळ आश्वासनांचे राजकारण न करता प्रत्यक्ष विकासकामांच्या जोरावरच महायुती निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात महायुतीला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत. विकास, विश्वास आणि नेतृत्व या त्रिसूत्रीवर आधारित ही लढत असून चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित असल्याची भावना असल्याचे मत शिवसेना नेते व चोपडी गावचे उपसरपंच पोपटशेठ यादव यांनी व्यक्त केले.


वाढेगावात प्रचार शुभारंभाला जनसागर; ‘घड्याळ’ चिन्हाच्या समर्थनात जोरदार एल्गार “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश मा.अतुल (मालक) पवार

 वाढेगावात प्रचार शुभारंभाला जनसागर; ‘घड्याळ’ चिन्हाच्या समर्थनात जोरदार एल्गार “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश मा.अतुल (मालक) पवार 



सांगोला प्रतिनिधी: 

वाढेगाव येथे आज झालेल्या भव्य प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला नागरिकांचा प्रचंड आणि उस्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमस्थळी सकाळपासूनच मोठी गर्दी उसळली होती. रस्ते, चौक आणि परिसरात घोषणाबाजी व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. स्थानिक राजकारणात या कार्यक्रमाची दिवसभर चर्चा रंगली.

कार्यक्रमादरम्यान कार्यकर्ते व नागरिकांनी दादांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली. “घड्याळ चिन्हाला मतदान हीच खरी श्रद्धांजली” असा संदेश देत समर्थकांनी एकजूट दाखवली. विविध भागांतून आलेल्या नागरिकांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी बोलताना मा. अतुल (मालक) पवार यांनी विरोधकांवर टीका करत विकासकामांच्या मुद्द्यावर भर दिला. ते म्हणाले, “दादांनी आयुष्य जनतेसाठी दिलं. वाढेगावला आश्वासनं नव्हे तर प्रत्यक्ष काम हवं आहे. घड्याळ चिन्ह हे विश्वास आणि सातत्यपूर्ण कामाचं प्रतीक आहे. जनतेचा कौल काम करणाऱ्यांच्या बाजूनेच लागेल.”

तसेच श्रीकांत दादा देशमुख यांनी आपल्या भाषणात विकासाचा मुद्दा पुढे करत समर्थकांना आवाहन केले. “वाढेगावच्या प्रगतीसाठी ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जनतेने अनुभवातून योग्य-अयोग्य ओळखलं आहे. घड्याळ चिन्हावर ठसा उमटवून विकासाच्या बाजूने उभे राहा,” असे ते म्हणाले.



कार्यक्रमात मा.अतुल (मालक) पवार , शिवसेना शिंदे गट युवा नेते मा. सागर पाटील, नूतन नगराध्यक्ष मा. आनंद भाऊ माने. नगरसेवक मा. काशिलिंग गावडे नगरसेवक मा.माऊली तेली, भाजपा उमेदवार सो भारती लालासाहेब देशमुख, शिवसेना उमेदवार सौ. राणी गजानन उबाळे

स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. प्रचार शुभारंभानंतर गावात राजकीय हालचालींना वेग आला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.


शुक्रवार, ३० जानेवारी, २०२६

कडलास जिल्हा परिषद गटातील, कडलास गणातील, व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू, प्रचाराला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद

 कडलास जिल्हा परिषद गटातील, कडलास गणातील, व अजनाळे गणातील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार धुमधडाक्यात सुरू, प्रचाराला जनसामान्यांचा मोठा प्रतिसाद



*कडलास जिल्हा परिषद गटातील चिणके, अजनाळे, कमलापूर, वझरे य.मंगेवाडी येथे प्रचारानिमित्त कुटुंबांना दिल्या भेटी.

सांगोला/ प्रतिनिधी:कडलास जिल्हा परिषद गटातून महायुतीच्या उमेदवार शिवसेनेच्या शोभाताई बाबासाहेब खटकाळे ,कडलास गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील ,अजनाळे गणाच्या भाजपच्या उमेदवार शितल सचिन भंडगे निवडणूक लढवीत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकारी ,मान्यवर ,कार्यकर्त्याकडून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.       


       ‌अजनाळे गणातील‌ अजनाळे, कमलापूर , य.मंगेवाडी, चिणके, वझरे या गावांमध्ये प्रचार करण्यात आला व महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याबाबत आवाहन करण्यात आले.


जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली

 जनता दारात… नेते गायब! आता मात्र अतुल (मालक) पवार लोकांच्या दारी — विरोधकांची झोप उडाली



लोक नेत्यांकडे धावत होते… आता नेता स्वतः लोकांकडे धावत आहे — अतुल (मालक) पवार यांची कार्यपद्धती चर्चेत

सांगोला प्रतिनिधी:

आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना आपली कामे, अडचणी आणि प्रश्न घेऊन पुढाऱ्यांच्या दारात तासन्‌तास थांबावे लागत होते. “उद्या या, परवा या” म्हणत लोकांची फिरवाफिरवी करणारी राजकीय संस्कृती अनेक वर्षे चालू होती. मात्र अतुल (मालक) पवार यांनी ही जुनी पद्धत मोडीत काढत लोकांकडे थेट जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्याची नवी कार्यशैली सुरू केली आहे.

आजवरची राजकीय परंपरा काय होती? — जनतेने नेत्यांच्या दारात उभं राहायचं, विनवण्या करायच्या, आणि शेवटी “पाहू पुढे” असं उत्तर घेऊन परत जायचं.

पण आता चित्र उलटं झालंय. अतुल (मालक) पवार यांनी नेत्यांनाच लोकांच्या दारात जाऊन कामे व अडचणी विचारण्याची सवय लावली आहे.


गावागावात भेटी, प्रत्यक्ष संवाद आणि त्वरित निर्णय — या त्रिसूत्रीवर काम करत अतुल पवार यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, अनेक वर्षे सत्तेत राहूनही केवळ आश्वासनांची फुगे उडवणाऱ्या विरोधकांवर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. निवडणुका आल्या कीच जनतेची आठवण काढणारे आणि उरलेल्या काळात गायब होणारे काही नेते आता अचानक सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे. मात्र “काम केलेल्यालाच मान” अशी स्पष्ट भूमिका मतदार घेत असल्याचे दिसून येते.

लोकांचे प्रश्न सोडवण्याऐवजी केवळ टीका आणि अडथळे निर्माण करणाऱ्या विरोधकांपेक्षा प्रत्यक्ष काम करणाऱ्या नेतृत्वाला लोक प्राधान्य देत आहेत. “कार्यालयात बसून राजकारण” करणाऱ्यांना आता “मैदानात उतरून काम” करणाऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे.



 


सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता हवी : माजी आम.शहाजीबापू पाटील

 सांगोला तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद पंचायत समितीत आपली सत्ता हवी : माजी आम.शहाजीबापू पाटील 



माजी आम. शहाजीबापू पाटील , कडलास गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील तसेच मान्यवरांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ 


*कडलास येथील लेंडवेमळा, गायकवाड वस्ती, करलवस्ती माने- महांकाळवस्ती, येथे गृहभेटी , प्रचार संपन्न


सांगोला/ प्रतिनिधी: पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थेत सांगोला तालुक्याच्या विकासासाठी आपणास सत्ता हवी आहे. सत्तेबरोबर राहिल्यास विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. विधानसभा निवडणुकीपासून दीपकआबांनी तीन वेळा विश्वास गमावला. यापूर्वी पंचायत समितीत स्व.आम. गणपतराव देशमुख व माजी आम.दीपकआबा साळुंखे पाटील यांना विचारल्याशिवाय जनतेची कामे होत नव्हती. जनतेच्या कामासाठीच आपल्याला सत्तेत सामील व्हायचे आहे. कडलास गावाला मी माझं गाव मानतो. तालुक्याच्या विकासासाठी माझ्याकडे खूप मोठी दूरदृष्टी असून माझी स्वप्ने वेगळी आहेत. सांगोला तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याच्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. 1995 व 2019 ला आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. त्यामुळे मी जनतेचे उपकार विसरणार नाही .नगरपालिकेत आपली सत्ता आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीत ही आपणास सत्ता खेचून आणायची आहे. कडलास गावच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन असे अभिवचन माजी आम. शहाजीबापू पाटील यांनी कडलास येथे प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी दिले. 

कडलास येथील खंडोबा मंदिर, सिद्धनाथ मंदिर व ग्रामदैवतांना नारळ फोडून माजी आम. शाहाजीबापू पाटील, महायुतीच्या शिवसेनेच्या कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे , गणाच्या उमेदवार राणीताई पाटील  व मान्यवरांच्या हस्ते गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

 यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीराव गायकवाड म्हणाले, महायुती सरकारमुळे व माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्यामुळे सांगोला तालुक्याचे परिवर्तन झाले. सांगोला तालुक्याच्या शेतीचा व पाण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. शहाजीबापू पाटील व आमच्या घराण्याचे जिव्हाळ्याचे नाते आहे. कडलास गावातून या दोन्ही उमेदवारांना मोठ्या प्रमाणात लीड देऊ असा विश्वास व्यक्त केला 

डॉ. विजय बाबर म्हणाले ,आमदार शहाजीबापू पाटील यांनी कडलास गावचा दुष्काळ हाटवला . चंद्र सूर्य असेपर्यंत तालुक्याला कायमस्वरूपी हक्काचं पाणी मिळणार आहे. महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करू असा शब्द दिला. 

यावेळी सुनीलनाना पवार म्हणाले, राज्यात महायुतीचे विकासाभिमुख सरकार आहे. बापूंनी कडलास गावात खूप विकासकामे केली आहेत. खंडोबा मंदिराचा समावेश ब वर्गात करावा अशी मागणी करीत गेल्या वर्षभरात तालुक्यात कोणतीही ठोस विकास कामे झाली नसल्याची खंत व्यक्त केली. यावर्षी दुष्काळाची चिन्ह आहेत. त्यामुळे पाणी ‌प्रश्नाबाबत सर्वांनाच दक्ष राहणे गरजेचे आहे. कडलास येथील लेंडवे मळा गायकवाडवस्ती, करलवस्ती, माने महांकाळवाडी येथे उमेदवारांनी कुटुंबांना भेटी देत प्रचार केला.

यावेळी भाजप -शिवसेना आर .पी. आय. महायुतीतील नेते ,भाजपचे ज्येष्ठनेते शिवाजीराव गायकवाड, सुनीलनाना पवार ,माजी जि. प. सदस्य अशोक शिंदे, उद्योगपती युवानेते योगेशदादा खटकाळे, सागरदादा पाटील, माजी सरपंच दिगंबर भजनावळे, चेअरमन अनिल खटकाळे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, उद्योगपती प्रशांत तेली,ग्रामपंचायत सदस्य राहुल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विजय ननवरे, दत्ता गायकवाड, दिगंबर गायकवाड ,तानाजी शिंदे,योगेश गायकवाड, उद्धव गायकवाड, महादेव गायकवाड, शिवाजी ठोकळे ,विजय गायकवाड, गणेश लवटे, भाऊसाहेब खटकाळे, पांडुरंग आसबे, प्रभाकर भगरे योगेश गायकवाड,सुदर्शन लिगाडे, वैभव गायकवाड, राजलक्ष्मी पाटील, अर्चना गायकवाड, अश्विनी गायकवाड ,ग्रामपंचायत सदस्य मंगलताई लेंडवे, जयश्री पवार ,मालन गायकवाड ,प्रणाली शिंदे, वनिता केदार, वर्षा पाटील ,आदी मान्यवर, पदाधिकारी कार्यकर्ते व बंधू-भगिनी प्रचारात सहभागी होते. मान्यवरांनी प्रत्येक कुटुंबाची भेट घेत महायुतीतील शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.




चौकट:  सामाजिक बांधिलकीत आमच्या कुटुंबाचा नेहमी सहभाग असतो. बापू आमदार नसताना आजही विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कडलास गावातील मतदारांनी कोणत्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता शिवसेनेचे दोन्ही उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवत असून त्यांना  बहुमताने विजयी करावे : युवानेते योगेशदादा खटकाळे


हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचा निर्धार; चेतनसिंह केदार सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प”

 “हळदीकुंकू कार्यक्रमात महिलांचा निर्धार; चेतनसिंह केदार सावंत यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प”


लाडकी बहीण ते स्वयंरोजगारापर्यंत… महिलांच्या विश्वासातून चेतनसिंह केदार सावंत यांचा विजय निश्चित



सांगोला प्रतिनिधी): चोपडी जिल्हा परिषद गटातील भाजप–शिवसेना–आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रचारार्थ सांगोला नगरपालिकेच्या नगरसेविका सौ. सुजाताताई केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली चोपडी जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना महिलांचा प्रचंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


     यावेळी सौ. सुजाताताई केदार सावंत यांनी महिलांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जाणून घेतल्या. महिलांच्या दैनंदिन जीवनातील आर्थिक व सामाजिक प्रश्नांवर त्यांनी अत्यंत आपुलकीने चर्चा केली. महिलांना सक्षम केल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही, हा महायुतीचा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अर्थसहाय्य, बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यास प्राधान्य, तसेच बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन सुजाताताई केदार सावंत यांनी दिले. यासोबतच गोरगरीब व सर्वसामान्य महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्राधान्य, तसेच महिलांसाठीच्या इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


       या कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांनी चोपडी जिल्हा परिषद गटाचे महायुतीचे उमेदवार चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वावर ठाम विश्वास व्यक्त करत, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे, महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे पाहिले जात असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले. हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या माध्यमातून महिलांमध्ये निर्माण झालेला उत्साह, सहभाग आणि विजयी निर्धार पाहता, चोपडी जिल्हा परिषद गटात महायुतीच्या प्रचाराला महिलांची भक्कम साथ मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे.




गुरुवार, २९ जानेवारी, २०२६

कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता,प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य: उमेदवार शोभाताई खटकाळे

 कडलास जिल्हा परिषद गटातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता,प्राथमिक शिक्षण या मूलभूत प्रश्नाला देणार प्राधान्य: उमेदवार शोभाताई खटकाळे



*कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील यांच्या प्रचारार्थ कडलास येथे मतदारांच्या गृहभेटीला उस्फूर्त प्रतिसाद 


सांगोला/ प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कडलास जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांचे मूलभूत प्रश्न रस्ते ,पाणी, वीज, आरोग्य, स्वच्छता, प्राथमिक शिक्षण या प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य देऊ असा विश्वास कडलास जिल्हा परिषद गटाच्या शिवसेनेच्या उमेदवार शोभाताई बाबासाहेब खटकाळे यांनी ग्रामस्थांना दिला आहे . निवडणुकीच्या दृष्टीने कडलास गटातील कडलास येथे प्रचार करीत असताना घरोघरी जाऊन या गावातील महिला व ग्रामस्थांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपण कटीबद्ध राहू असा ठाम विश्वास येथील मतदार जनतेला देण्यात आला.  कडलास गणाच्या शिवसेनेच्या उमेदवार राणीताई सुरज पाटील याही या प्रचारामध्ये सहभागी झाल्या होत्या. कडलास येथील लिगाडे गल्लीतून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास व प्रचारास सुरुवात करण्यात आली. 


मा. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे दोन्ही उमेदवार प्रचारात आघाडीवर असून हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशा प्रतिक्रिया जनसामान्यातून व्यक्त केल्या जात आहेत.

या प्रचारप्रसंगी अर्चना गायकवाड, अश्विनी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मंगलताई लेंडवे, जयश्री पवार ,मालन गायकवाड, अर्चना गायकवाड, राजलक्ष्मी पाटील, प्रणाली शिंदे, सोनाली आसबे, वनिता केदार ,वर्षा पाटील, शोभा लिगाडे, सुमन जाधव या महिला भगिनींचा समावेश होता. तर मान्यवरामध्ये सुनीलनाना पवार, शहाजी चव्हाण, डॉ. विजय बाबर ,मुकुंद पाटील, नितीन गायकवाड, सयाजी गायकवाड, सुनील महांकाळ, सुशांत जाधव, सिद्धेश्वर ढेबे, वैभव लेंडवे, दत्ता गायकवाड, महेश गुरव हे सहभागी झाले होते.



Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart