सोलापूर विधान परिषदेसाठी सांगोल्यातील राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा
पक्षनिष्ठा आणि केलेल्या विकास कामाच्या जोरावर राजश्रीताई नागणे पाटील यांना संधी द्यावी : कार्यकर्त्यांची मागणी
सांगोला वृत्तवेध :
महिला आरक्षण धोरण डोक्यात ठेवून सहज निवडून येणाऱ्या जागांवर महिलांना संधी देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. यामध्ये सोलापूर विधानपरिषदेसाठी एकूण 3 महिला उमेदवारांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपाच्या प्रदेश कार्यकारणी सदस्या, सांगोल्यातील सौ. राजश्रीताई नागणे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये सांगोला तालुक्याला संधी मिळावी अशी मागणी प्रमुख नेतेमंडळीसह भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
भाजपासाठी एकतर्फी निवडणूक असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी महिला उमेदवार देण्याबाबत पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या असून आता यासाठी राजश्रीताई नागणे - पाटील, रश्मीताई बागल, आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर श्रद्धा जवंजाळ या तीन नेत्यांची नावे रेसमध्ये आल्याची माहिती समोर येत आहे. सोलापूर विधान परिषदेच्या 616 मतांपैकी साडेचारशे पेक्षा जास्त मते भाजप आणि मित्रांकडे असून शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मतांची बेरीज केल्यास विरोधकांकडे मते शिल्लक राहत आहेत.अशावेळी महिला आरक्षण धोरण डोक्यात ठेवून सहज निवडून येणाऱ्या जागांवर महिलांना संधी देण्यासाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. त्यामुळे भाजपकडून अजून कोणीही उमेदवारी अर्ज घेण्यासाठी पक्षाने सूचना दिलेल्या नाहीत. सध्या सोलापूर विधान परिषदेसाठी जिल्हा परिषद सदस्य रश्मी बागल, सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा जवंजाळ आणि भाजप महिला आघाडीतील कोअर लीडर असणाऱ्या राजश्री नागणे ही तीन नावे पुन्हा एकदा नव्याने चर्चेत आली आहेत.
सध्या भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, राजेंद्र राऊत, विक्रम देशमुख, शिवाजीराव सावंत आणि रणजितसिंह मोहिते पाटील, भाऊसाहेब रुपनर यांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र सोलापूरच्या जागेचा निर्णय मुख्यमंत्री हे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सल्ल्याने घेणार असल्याची माहिती आहे. अशावेळी पक्षाकडून सर्वात सेफ असणाऱ्या सोलापूर विधान परिषदेसाठी महिला उमेदवार देऊन महिला आस्थण धोरण भाजप राबवित असल्याचे दाखवून द्यायचे त्यामुळेच सोलापूर विधान परिषदेसाठी महिलांना संधी देण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी मोजकाच कालावधी शिल्लक असताना अनपेक्षित नाव पुढे येण्याची शक्यता असल्याबाबत बोलले जात आहे. तत्पूर्वी सांगोल्यातून राजश्रीताई नागणे पाटील यांना संधी मिळावी अशी माफक अपेक्षा सांगोलकरांकडून केली जात आहे. त्यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. तसेच सामाजिक कार्यातून अनेक गोरगरीब गरजूंना त्यांनी मदत केली आहे. सांगोला तालुक्यात तब्बल 30 हजार महिलांचा मेळावा घेतला, या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सांगोल्यातून राख्या पाठवून दिल्या. या निमित्ताने लाडक्या बहिणीचा सन्मान म्हणून साड्या वाटप केल्या, महिलांच्या अडी अडचणी जाणून घेत त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे आहे. तालुक्यात विविध गावात रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत, शेतकऱ्यांना स्वतंत्र डीपी बसवून देण्यात आला आहे, पाण्याच्या अडचणी सोडवले आहेत. धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने राबवले आहेत. तालुक्याच्या पाणी प्रश्नावर त्यांनी आक्रमक भूमिका घेवून ती पाणी प्रश्नाचा मार्ग मोकळा केला. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विकासकामांना भरीव निधी दिला. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक समृद्ध करण्याबरोबर त्यांनी तयार केलेल्या प्रोडक्ट ला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला, डिजिटल शाळा करून, शाळेला पाण्याची व्यवस्था करून दिली, दुष्काळावर मात करण्यासाठी जनावरांसोबत पशुपालकांनी तब्बल 27 दिवस सांगोला तहसील समोर पाण्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनातील मागण्यावर तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार मान नदीला पाणी सोडून आंदोलन मागे घेतले. रात्री 2 वाजता देखील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार अधिकाऱ्यांना कॅनल वर शेतकऱ्यांच्या शेतात पाणी सोडण्याचे धाडस दाखवले, शेतकरी मेळावे घेऊन शेतकऱ्यांना बी बियाणे वाटप केले, यासह महापर्जन्य यज्ञ, टंचाई काळात चारा छावणी वर जाऊन पशुपालकांना स्नेहभोजन देणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, कुंकुमार्चन कार्यक्रमातून महिलांचा सन्मान, शासकीय योजना तालुक्यातील तळागाळातील महिला पर्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी दिलेले योगदान यामध्ये प्रामुख्याने संसार साहित्य वाटप करण्यामध्ये घेतलेला पुढाकार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत त्यांचा केलेला सत्कार, कोरोना काळात रुग्णांना व तालुक्यातील नागरिकांना केलेली मदत, वृद्धाश्रम व अनाथ मुलांच्या शाळेवरील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच अन्नधान्य वाटप, शेती व क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा केलेला गुणगौरव, तहसील कार्यालय पोलीस स्टेशन तसेच विविध प्रशासकीय विभागातील नागरिकांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पक्ष संघटन वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, हर घर तिरंगा यावेळी शासनाच्या आदेशानुसार गावोगावी प्रसिद्धी आणि प्रचार करण्यामध्ये केलेले काम, या सह तालुक्याच्या विविध प्रश्नावर आवाज उठवून थेट मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून सदरचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केली धडपड यासह सामान्य कार्यकर्त्यांना देखील सन्मानाची वागणूक आणि त्यांचे काम मार्गे लावण्यापर्यंत केलेले प्रयत्न यामुळे सांगोला तालुक्यातून त्यांच्या नावाला पसंती दर्शवली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री व पालकमंत्री नेमका कोणता निर्णय घेणार आणि कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा