तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्द सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार संपन्न .
तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्द सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार संपन्न .
सांगोला/ प्रतिनिधी:
सांगोलचे तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावर पदोन्नती झाल्याबद्दल सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्यावतीने डिजिटल मीडियाचे राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत व ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे यांच्या हस्ते व संघटनेतील पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत तहसीलदार संतोष कणसे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे म्हणाले, तहसीलदार संतोष कणसे यांनी आपल्या कार्यकाळात सांगोला तालुक्यातील सर्वसामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून उत्कृष्ट काम केले आहे. तहसीलदार संतोष कणसे यांच्या सर्व प्रकारच्या लोकाभिमुख कामकाज कार्यपद्धतीमुळे त्यांचा लौकिक सांगोला तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. तालुक्यातील नागरिकांचे कोणत्याही प्रकारचे काम असो ते त्यांनी कोणताही विलंब न लावता वेळेवर पूर्ण केले आहे. सांगोला तालुक्यातील अतिवृष्टीचा प्रश्न त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल प्रशासनानेही घेतली आहे. त्यामुळे त्यांची उपजिल्हाधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. भविष्यात त्यांना जिल्हाधिकारी पदावर काम करण्याची संधी मिळावी अशा प्रकारच्या शुभेच्छा पत्रकार संघटनेतील पत्रकार बांधवांच्या वतीने व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी बहुजन नेते बापूसाहेब ठोकळे म्हणाले, तहसीलदार संतोष कणसे यांनी केलेले कार्य अतुलनीय असून त्यांच्या कार्याची दखल सांगोला तालुक्यातील जनतेने घेतली आहे. अतिवृष्टीसारख्या प्रश्नावरती शेतकरी बांधवांना त्यांनी खऱ्या अर्थाने न्याय देऊन शासनाची मदत मिळवून दिली आहे. कोणतेही काम असो ते वेळेवर पूर्ण करणे हा त्यांच्या कार्याचा मोठेपणा आहे. तहसील कार्यालयातील सर्व प्रकारच्या कामकाजा संदर्भात त्यांनी प्रशासनाला वेळेवर कामे पूर्ण करण्याला प्राधान्य द्यावे असे सुचित केले होते. कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकाला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता वेळेवर काम पूर्ण करणे अशी तहसीलदार संतोष कणसे यांची कार्य पद्धती आहे. या कामातच तहसीलदार संतोष कणसे खरा आनंद मिळत असल्याचे मानत होते. तहसीलदार संतोष कणसे यांची उपजिल्हाधिकारी पदावरती पदोन्नती झाली असून त्यांना भविष्यात जिल्हाधिकारीपद मिळावे अशा सदिच्छा व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी निवासी नायब तहसीलदार सोमनाथ साळुंखे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सतीशभाऊ सावंत, महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे, या दोन्ही संघटनेचे पदाधिकारी पत्रकार सचिन धांडोरे, दशरथ बाबर, समाधान धांडोरे, करण मोरे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक ऐवळे, विनोद चंदनशिवे, दत्तात्रय पवार, सचिन कुंभार तसेच चेअरमन दगडू बाबर, ॲड. समाधान करडे, गौतम शिंदे, बंडू बनसोडे, प्रमोद बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट:
सांगोला तालुक्यात तहसीलदार म्हणून काम करत असताना गोरगरीब, सर्वसामान्याना दैनंदिन कामकाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्याय दिला आहे. कोणतेही काम असो ते वेळेवर करून सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने आनंद दिला आहे. सांगोलाकरांनी खूप प्रेम दिले आहे. महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी आभार .
:तहसीलदार संतोष कणसे, (उपजिल्हाधिकारी)



No comments