Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथील शिंदे वस्ती शाळेत नूतन शिक्षकांचा स्वागत समारंभ .

 वाटंबरे येथील शिंदे वस्ती शाळेत नूतन शिक्षकांचा स्वागत समारंभ .



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती वाटंबरे येथे नव्याने हजर झालेले शिक्षक  संभाजी ज्ञानू पवार व  सुवर्णा सर्जेराव सावंत यांचे स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  धीरज पवार, उपाध्यक्षा सुषमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य तसेच पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होतं . याा कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य बबन दादा पवार होते . सूत्रसंचालन  पांडुरंग महादेव पवार यांनी  केले .या वेळी शिक्षक संभाजी पवार व सुवर्णा सावंत यांनी शाळा व्यवस्थापन समिती व सर्व पालकांचे आभार मानले तसेच विद्यार्थी घडवण्यासाठी आम्ही आमचे शंभर टक्के योगदान देणार आहोत व आम्हाला सर्व पालकांनी सहकार्य करावे असे त्यांनी पालकांना आव्हान केले . या कार्यक्रमाला शाळेेत व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य , पालक वर्ग, अंगणवाडी सेविका, मदतनीस यावेळी  उपस्थित होते.





No comments