विजयादशमी दसरा निमित्त मल्हारी मार्तंड जेजुरी गडावर मोठ्या दिमाखात सोहळा संपन्न.
विजयादशमी दसरा निमित्त मल्हारी मार्तंड जेजुरी गडावर मोठ्या दिमाखात सोहळा संपन्न.
पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड
०२ आक्टोंबर 2025 रोजी विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावर जेजुरी गडावरती सोहळा संपन्न झाला.
जेजुरी गडावर ग्रामस्थ व संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो मल्हारी मार्तंड भक्तगण या सोहळ्यासाठी आले होते. मल्हारी मार्तंडांची पालखी गडाच्या चारी बाजूने वाजत गाजत मोठ्या भक्ती भावाने भक्तगणांच्या उपस्थितीत मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये सर्व खांदेकरी ,गावकरी ,मानकरी, पोलीस प्रशासन ,तसेच इतर शासकीय प्रशासन यांचा व देवस्थान कमिटी यांचा मोठ्या संख्येने सहभागी होते.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अनघलक्ष्मी दुर्गा मॅडम तसेच इतर खांदेकरी , भक्तगण या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होते.


No comments