अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.
अभिनव पब्लिक स्कूल अजनाळे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा.
प्रतिनिधी :शशिकांत कोळी.
५ सप्टेंबर हा सर्व शिक्षकांच्या सन्मानाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या घडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खऱ्या शिक्षकांना वंदन करण्यासाठी अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवशी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी “शिक्षक बनायचंच” ही परंपरा जपत शिक्षकांच्या भूमिकेत शाळेत हजेरी लावली. ८ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या उपक्रमात दहावीचे मंथन धांडोरे मुख्याध्यापक तर मानसी कोळवले उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. सुमित येलपले, सोहम येलपले, तेजस लाडे, सुजल येलपले, रोशन कोळवले, यश चोरमले, सुप्रिया चोरमले तसेच नववीचे अनिकेत कोळवले, अथर्व कोळवले, आयुष लाडे, अद्वैत बाबर, विशाल येलपले, आदित्य एरंडे, सक्षम येलपले, प्रणव भंडगे, साहिल चौगुले, करण विभुते, अक्षदा बाबर, शमिका कोळवले, सायली येलपले, तनिष्का येलपले, सलोनी लाडे, ऋषिका येलपले, पायल कोळवले, दिव्या भंडगे यांनी परिपाठापासून शिकवणीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या.
दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित केला. यात “श्यामची आई” हे पुस्तक व पेन भेट देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी व इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी आकर्षक फ्रेम्स भेट करून आपले प्रेम व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या मनोगतातून शिक्षकांविषयीची कृतज्ञता, आदर आणि आपुलकी व्यक्त झाली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी कोळवले हिने केले तर आभार प्रदर्शन सलोनी लाडे हिने केले. मुख्याध्यापकीय भाषणामध्ये मंथन धांडोरे यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यामागील प्रेरणादायी इतिहास स्पष्ट केला.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या उपक्रमांच्या आणि त्यांच्या सहभागाचे भरभरून स्वागत केले.
अशा प्रकारे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त अभिनव पब्लिक स्कूल, अजनाळे येथे शिक्षक दिन आनंद, उत्साह आणि आदराच्या वातावरणात साजरा करण्यात आला. शिक्षक दिन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नववी व दहावीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



No comments