कु.प्रणिती पवार या विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुयश.
कु.प्रणिती पवार या विद्यार्थिनीचे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सुयश.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक गुरुवर्य कै. बापूसाहेब झपके यांच्या स्मृतिदिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत पायोनियर निवासी गुरुकुल य.मंगेवाडी या प्रशालेची विद्यार्थिनी कु. प्रणिती राजेंद्र पवार हिने आठवी ते दहावी या गटात प्रथम क्रमांक मिळवत आपल्या प्रशालेचे नाव उज्वल केले. या यशात तिला शाळेचे संस्थाध्यक्ष व प्राचार्य व शिक्षकांचे मोठे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल तिचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,पालक व ग्रामस्थांमधून अभिनंदन केले जात आहे.




No comments