हाजी हिदायतुल्ला मुलांनी(गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन.
हाजी हिदायतुल्ला मुलांनी(गुरुजी) यांचे अल्पशा आजाराने दुखःद निधन.
वाटंबरे/प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त शिक्षक हिदायतुल्ला सुलतान मुलानी यांचे शुक्रवार दि. १३ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. निधना वेळी त्यांचे वय ७५ वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे ते जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या जाण्याने मित्रपरिवार व गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे .त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी वाटंबरे येथील मुस्लिम कब्रस्तान येथे होणार आहे याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.


No comments