मंगळवेढ्याची ओळख संतांच्या भूमी प्रमाणे आरोग्यनगरी म्हणून व्हावी:प्रवीण गुंड सर
मंगळवेढ्याची ओळख संतांच्या भूमी प्रमाणे आरोग्यनगरी म्हणून व्हावी:प्रवीण गुंड सर
(समर्थ संस्थेचे आरोग्य शिबीर शुशूविहार मध्ये संपन्न)
मंगळवेढा :समर्थ बहुउद्देशीय विकास संस्था, न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शुशूविहार मंगळवेढा या ठिकाणी व्यसनमुक्त,मधुमेहमुक्त व रोगमुक्त शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिजामाता प्राथमिक प्रशालेचे मुख्याध्यापक प्रवीण गुंड सर यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करून मंगळवेढेकर व्यसनमुक्त व रोगमुक्त व्हावे.मंगळवेढ्याची ओळख ही भूमी संतांची म्हणून ओळखली जाते त्याचप्रमाणे निरोगी व आरोग्य संपन्न होऊन एक निरोगी आरोग्य नगरी अशी ओळख निर्माण व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी नियोजित निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख वैभव पाटील यांनी आपण यापुढे सामाजिक बांधिलकी म्हणून व्यसनमुक्ती या कार्यात अग्रेसर राहून एक व्यसनमुक्त समाज घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.प्रमुख पाहुणे न्यूट्रीस्टार हेल्थ प्रोडक्टचे चेअरमन प्रदीप कुंभारसो यांनी व्यसनमुक्त मधुमेहमुक्त रोगमुक्त मंगळवेढा बनवण्यासाठी न्यूट्रीस्टार समूहाच्या माध्यमातून सर्वोत्परी मदत करण्याचे वचन दिले. यावेळी संचालक भरत वरुटेसो यांनी निरोगी आरोग्यासाठी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक अशोक उन्हाळेसो यांनी केले तसेच अशोक उन्हाळे यांनी व्यसनमुक्ती साठीचे बहुमोल विचार व्यक्त केले.प्रास्ताविक समर्थ संस्थेचे अध्यक्ष दिगंबर साळुंखेसर व आभार डॉक्टर सतीश येलपले यांनी मानले. हा कार्यक्रम समर्थ प्रशिक्षण केंद्राचे समन्वयक दिनेश मुद्गुल सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.या कार्यक्रमास मासाळ सर, युनूस पठाण सर,पिंटू नागणे,बाबासाहेब कोळी नाईकवाडी,अमर माळी,युवराज घोडके,संजय जाधव, यांचे सह अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments