Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, वाटंबरे येथे 79 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरी.

 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल, वाटंबरे येथे 79  स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज वाटंबरे येथे देशाचा 79 वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. सकाळी ठीक 8:00वाजता स्वातंत्र्य दिनानिमित्त घोषणा देत सर्वप्रथम जि. प.प्रा. केंद्र शाळा वाटंबरे येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत वाटंबरे व तलाठी कार्यालय वाटंबरे येथील ध्वजारोहण करून प्रभात फेरी प्रशालेच्या प्रांगणात दाखल झाली.           

     


  प्रशालेतील ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष मा. मोहनराव पवार सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सदस्य ,वाटंबरे ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्य ,विविध संस्थांचे पदाधिकारी ,आजी-माजी सैनिक, पालक ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी जोरदार जयघोष करत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्य गीत यांच्या सादरीकरणानंतर विद्यार्थ्यांचे संचलन व कवायत प्रकार घेण्यात आले .प्रशालेच्या विद्यार्थिनींनी विविध देशभक्तीपर गीत गायन अर्थात गीत मंचचा कार्यक्रम सादर केला .त्यानंतर एल. के .पी .शाखा वाटंबरे या बँकेतर्फे सन २०२४-२५ मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षेत प्रशालेतून प्रथम ,द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाल, ट्रॉफी व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला .याद्वारे विद्यार्थ्यांच्या एक प्रकारची प्रेरणा निर्माण करण्यात आली. प्रशाले कडूनही काही विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले. यात' पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती' परीक्षा इयत्ता पाचवी मधून शिष्यवृत्ती पात्र झालेली कु.आरोही यशवंत चव्हाण या विद्यार्थिनीचा सत्कार तिच्या पालकांसमवेत प्रशालेच्या वतीने करण्यात आला. तसेच प्रशालेची माजी विद्यार्थिनी कु.कोमल उत्तम पवार हिला 'गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज ,रत्नागिरी 'येथे 'एमबीबीएस 'ला प्रवेश मिळाल्याबद्दल तिचा पालकांचा प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला .एक आदर्श पालक म्हणून त्यांचा गुणगौरव करण्यात आला.

        स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.मोहनराव पवार सर यांनी आपल्या भाषणातून स्वातंत्र्याचे महत्त्व व देशभक्तीचा संदेश विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. शेवटी खाऊ वाटप व मान्यवरांचे आभार मानण्यात आले .या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक श्री पी. डी.पवार सर व चव्हाण सर यांनी केले .प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नीता पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले .मोठ्या आनंदी वातावरणात देशाचा स्वातंत्र्य दिन प्रशालेच्या वतीने साजरा करण्यात आला.


No comments