Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

टाळ मृदुंगाच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज वाटंबरे प्रशालेचा दिंडी सोहळा संपन्न.

 टाळ मृदुंगाच्या गजरात श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज वाटंबरे प्रशालेचा दिंडी सोहळा संपन्न.



आषाढी एकादशी निमित्त सर्व महाराष्ट्रात विठ्ठल नामाचा गजर केला जात आहे सर्व प्राथमिक , माध्यमिक,  ज्युनिअर कॉलेजातुन विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा निघत आहे या धर्तीवर सांगोला तालुका वाटंबरे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनिअर कॉलेज या प्रशालेचा शनिवार दि. ५ जुलै रोजी टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी  सोहळा संपन्न झाला.

या दिंडीला प्रशालेच्या प्राणंगणातून विठ्ठल रुक्मिणीच्या पूजनाने सुरुवात करण्यात आली यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ,संत मुक्ताई  तसेच विविध संतांचे रुपे घेतली होती. टाळ मृदंगाच्या गजरात या दिंडीला प्रांगणातून सुरुवात झाली राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूला खाली यावेळी विद्यार्थ्यांनी भक्ती गीते व नृत्ये सादर केली हा सोहळा पाहण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थांनी गर्दी केली होती नंतर हा पायी दिंडी सोहळा गावातुन जाताना त्यांचे गावातील महिलांनी विधिवत पूजा केली तसेच खंडोबा देवस्थान मध्ये टाळ मृदंगाच्या गजरात शाळेतील विद्यार्थ्यांनी फुगडी तसेच विविध नृत्य सादर केली.


हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका निता पवार तसेच पर्यवेक्षक शिवशरण सर व शिक्षक व शिक्षकेत्तर  कर्मचारी वर्ग यांनी मोठ्या प्रमाणावर परीश्रम घेतले.

No comments