Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

१ जुलै डॉक्टर्स डे दिनानिमित्त सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान*

 *१ जुलै डॉक्टर्स डे दिनानिमित्त सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्यावतीने वैद्यकीय क्षेत्रातील आधारवड डॉ.अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान*








सांगोला (तालुका प्रतिनिधी): १ जुलै डॉक्टर्स डे सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन यांच्या वतीने  सांगोला पंचक्रोशीतील सर्व डॉक्टर्स यांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व सांगोला तालुक्यातील पहिले एम.एस. सर्जन डॉ. अमरसिंह शिवाजीराव शेंडे यांना सांगोला तालुका डॉक्टर्स असोसिएशन ,सांगोला यांच्यावतीने सर्व डॉक्टरांच्या प्रमुख उपस्थितीत मेडिकल व सर्जरी क्षेत्रातील गौरवशाली कामगिरी बद्दल "जीवन गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला.

 सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातला पहिला अतिदक्षता विभाग, पहिलं सीटी स्कॅन सेंटर, पहिलं सोनोग्राफी सेंटर, पहिलं डायलिसिस युनिट, पहिलं सुसज्ज ऑपरेशन थिएटर डॉ.अमर शेंडे सर यांच्या आनंद हॉस्पिटलमध्येच कार्यरत झालं. आनंद हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातलं ते पहिलं आयएसओ मानांकन प्राप्त हॉस्पिटल आहे. 

डॉक्टर अमरसिंह शिवाजीराव शेंडे हे आजमितीस सांगोला पंचक्रोशीतील सर्जरी क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून ओळखले जातात. कोणत्याही ज्युनिअर सर्जनला आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यास ते नेहमी तत्पर असतात. आपत्कालीन परिस्थितीत कौशल्यानं सर्जरी करून हजारो रुग्णांना जीवनदान देणारे देवतुल्य डॉक्टर म्ह्णून डॉ.अमर शेंडे यांची वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे.तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, कृषि , वैद्यकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्यांचा आधारवड, असा त्यांचा लौकिक आहे. वैद्यकीय व सर्जरी क्षेत्रांमधील डॉ.शेंडे यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेऊन डॉक्टर्स असोसिएशन यांचेकडून डॉक्टर दिनाचे औचित्य साधून डॉ.शेंडे यांना सपत्नीक  "जीवन गौरव पुरस्कार " बहाल करण्यात आला.

No comments