सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार ,कांताभाऊ राठोड यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
सामाजिक कार्यकर्ते , पत्रकार ,कांताभाऊ राठोड यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
26 जून 2025 रोजी पुणे येथील निवारा वृद्धाश्रम हॉल मध्ये राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष सुनिल गोरे यांनी पुरस्कार आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे सुभेदार नरवीर , शूरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज मा. बाळासाहेब मालुसरे यांच्या हस्ते पत्रकार,कांताभाऊ राठोड यांना राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रभक्ती जनविकास संघटनेचे संस्थापक ,अध्यक्ष मा.सुनील गोरे तसेच मा.बाळासाहेब मालुसरे,मा .नाथाभाऊ शेवाळे,मा .बाळासाहेब हरपळे, मा.महेश थोरवे सर ,मा.अनिल जाहीर सर ,मा.गोपाळ खंडारे सर ,मा.आशुबा खेडेकर सर,मा .सुधीरभाऊ गाडेकर ,सौ.भारतीताई तुपे ,सौ.श्रद्धा ताई परांडे ,मा.स्वप्निल माने (पाटील),मा .लेशपाल जवळगे तसेच राष्ट्रभक्ती संघटनेचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला .
यावेळी इतर क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मा.संजय खंडारे, मा.अशोक पाटील सौ.स्मिता भंगाळे ,सौ.अनघलक्ष्मी दुर्गा,मा.हर्षद जाधव व
यावेळी प्रमुख मान्यवरांनी पुरस्कार्थी यांना मार्गदर्शन केले व खूप खूप शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रभक्ती महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय पुरस्कार्थी , आरोग्य दूत अनघलक्ष्मी दुर्गा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की .
पूर्वीच्या काळातील शूरवीर,नरवीर, सरदार, सुभेदार होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजानी 18 पगड 18 जातीच्या मावळ्यांना एकत्र करून सर्व जाती धर्म विसरून सगळ्यांना आपलेसे केले. एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे आपण फक्त वाचतोय प्रत्यक्ष बघितलेले नाही पण त्या काळातल्या पूर्वजांचा अंश म्हणजेच मा. बाळासाहेब मालुसरे हे तानाजी मालुसरे यांचे वंशज आपल्या सर्वांना अनुभवता आले व आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती लाभली याच्यासारखा भाग्याचा क्षण नाही.

No comments