वाटंबरे येथील मुक्कामी दिंड्यांना सुविधा उपलब्ध कराव्यात – वारकऱ्यांची मागणी
वाटंबरे येथील मुक्कामी दिंड्यांना सुविधा उपलब्ध कराव्यात – वारकऱ्यांची मागणी
वाटंबरे (प्रतिनिधी) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणाऱ्या दिंड्यांना वाटंबरे येथे मुक्कामासाठी थांबावे लागते. मात्र, येथे मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशी जोरदार मागणी वारकऱ्यांकडून होत आहे.प्रत्येक वर्षी प्रमाणे यंदाही गोवा , कर्नाटक , दक्षिण महाराष्ट्र,कोल्हापूर इचलकरंजी , सांगली तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो वारकरी पायी वारी करत पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत. वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी प्रसिद्ध असलेले सांगोला तालुका येथील खंडोबा देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले वाटंबरे त्यामार्गातील महत्त्वाचे थांबण्याचे ठिकाण असल्याने येथे दिंड्यांचा मोठा मुक्काम होतो. या ठिकाणी खंडोबा देवस्थान ,माणकेश्वर मंदिर, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल प्रशालेच्या पटांगणात तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर दिंड्यांचा मुक्काम असतो परंतु या ठिकाणी स्वच्छतागृहे नसल्याने मोठ्या प्रमाणामध्ये महिला वारकऱ्यांची कुचुंबना होते तसेच पिण्याच्या पाण्याची सोय, प्राथमिक वैद्यकीय सुविधा यांचा अभाव स्पष्टपणे जाणवत असल्याने वारकऱ्यांमधुन नाराजी व्यक्त केली जात आसते .
प्रशासनाने वाटंबरे येथे वारकऱ्यांसाठी फिरते शौचालय , वैद्यकीय सेवा, पिण्याची पाणी याची सोय करण्याची वारकऱ्यांमधून मागणी केली जात आहे.
संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्यांच्या प्रेरणेतून निघालेल्या दिंड्यांना वाटंबरे येथे सुरक्षित आणि सुखद मुक्काम व्हावा, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा वारकरी व्यक्त करत आहेत.


No comments