शक्तिपीठ महामार्ग रद्द करा.. शेतकरी संघर्ष समितीची मागणी.. शेतकरी आक्रमक*
*शक्तिपीठ महामार्ग रद्द करा.. शेतकरी संघर्ष समितीची मागणी.. शेतकरी आक्रमक*
सांगोला प्रतिनिधी
नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गातील सर्व बाधित गावातून व जिल्ह्यातून विरोध शक्तिपीठ महामार्ग होत असताना शासनाने सांगोला तालुक्यात एक जुलैपासून मोजणी करणारा असे सांगितले परंतु मोजणीस येणाऱ्या अधिकाऱ्यास जमिनीत पाय ठेवू देणार नाही व पोलीस बळाचा वापर केल्यास सर्व सांगोला तालुक्यातील शेतकरी पेटून उठतील असा खणखणीत इशारा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष ऍड. सचिन देशमुख यांनी दिला आहे.
शक्तीपीठ महामार्गाचे मोजणीपूर्वी बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना नोटीस देणे गरजेचे आहे तसेच मंगळवेढा प्रांत कार्यालयाने यापूर्वी बाधित शेतकऱ्यांच्या हरकती घेतल्या त्याचा निर्णय अद्याप झालेला नाही व चुकीच्या पद्धतीने मोजणी सुरू करणारा असल्यास जमिनीत पाय ठेवू देणार नाही व यासाठी शेतकरी संघर्ष कृती समितीचे घोषणा करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्षपदी ऍड. सचिन देशमुख, उपाध्यक्ष दादासो वाघमोडे, प्रकाश सोळशे, तर सचिव पदी ऍड. शरद यादव यांची निवड झाली आहे.
सांगोला तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे व आता कुठे टेंभू, मैशाळ पाणी आल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात असताना त्यांच्या जमिनी शक्तीपीठ महामार्गात जाणार असल्याने त्यांना उत्पन्नाला कायमस्वरूपी मुकावे लागणार आहे यासाठी शासनाने हा महामार्ग रद्द करावा असे उपाध्यक्ष दादासो वाघमोडे यांनी सांगितले. तर येत्या एक जुलै रोजी सर्व बाधित जिल्ह्यात शेतकरी रास्ता रोको करणार आहेत त्या पद्धतीने अनक ढाळ टोल नाका ता. सांगोला येथे रास्ता रोको शेतकरी करणार आहेत असे सचिव ऍड. शरद यादव यांनी सांगितले. शेवटी सर्वांचे आभार उपाध्यक्ष प्रकाश सोळशे यांनी मानले.

No comments