उदनवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी
उदनवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी
वाटंबरे /प्रतिनिधी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती शनिवार, दि. ३१ मे रोजी उदनवाडी येथे उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या प्रतिमेची विधिवत पूजा केली . गावाचे सरपंच संदीप सरगर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा विजय असो येळकोट येळकोट जय मल्हार अशा उपस्थिततांमधून घोषणा देण्यात आल्या .
या कार्यक्रमाला "राजमाता अहिल्यादेवी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ – उदनवाडी" या मंडळाचे सदस्य, गावातील महिला भगिनी, ग्रामस्थ, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायंकाळी "मायाक्कादेवी ओविकार मंडळ – उदनवाडी" यांच्या वतीने अहिल्यादेवींच्या जीवनचरित्रावर आधारित ओविंचा कार्यक्रम पार पडला. या सादरीकरणातून अहिल्यादेवींचे कार्य, समाजसेवा आणि आदर्श नेतृत्व उलगडून दाखवले
गेले.

No comments