Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

उदनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आनंदमय व भक्तिमय वातावरणात साजरा .

 उदनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आनंदमय व भक्तिमय वातावरणात साजरा .

उदनवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वर्ष 23 वे शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 ते शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये ह .भ. प. प्रभाकर आप्पा शेडसाळे महाराज यांच्या प्रेरणेने संपन्न झाला. या अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये व्यासपीठ चालक व सूत्रसंचालक म्हणून ह. भ. प. एकनाथ गायकवाड महाराज शेटफळे यांचे सहकार्य लाभले. या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये रोज सकाळी काकड आरती, ज्ञानेश्वरी ग्रंथाचे वाचन, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ व संध्याकाळी कीर्तन असे भक्तिमय कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमांमध्ये उदनवाडी व उदनवाडी परिसरातील सर्व भाविक भक्त, महिला भगिनी, लहान थोर मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाले व भक्तीचा महिमा जाणून घेतला. शनिवार दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी काल्याचे किर्तन व महाप्रसादाने या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. अखंड हरिनाम सप्ताहामुळे सर्व उदणवाडी गाव भक्तिमय झाले होते. अखंड हरिनाम सप्ताहामुळे सर्व समाज एकत्र येऊन सामाजिक एकता साधण्याचे काम झाले हा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी उदनवाडी व उदनवाडी परिसरातील सर्व भाविक भक्त, महिला भगिनी, लहान थोर मंडळी, हनुमान मंडळातील सर्व सदस्य, हनुमान भजनी मंडळ उदनवाडी, एकता भजनी मंडळ उदनवाडी, नवतरुण मंडळ उदनवाडी, तसेच उदनवाडी व उदनवाडी परिसरातील सर्व युवक यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.

No comments