Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

राजुरी येथे लहान मुलीचा झोका खेळत असताना झोक्याच्या दोरीत गळा अडकल्याने दुर्दैवी अंत

 राजुरी येथे लहान मुलीचा झोका खेळत असताना झोक्याच्या दोरीत गळा अडकल्याने दुर्दैवी अंत.



वाटंबरे /प्रतिनिधी:

सांगोला तालुका राजुरी येथे ऋतुजा डोरले इयत्ता दुसरी मध्ये शिकणारी  ८ वर्षीय मुलीचा झोका खेळत असताना झोक्याच्या दोरीत गळा अडकून दुर्दैवी अंत झाल्याची घटना रविवार दि. 2 मार्च रोजी घडली. या घटनेची फिर्याद  भीमराव डोरले यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे. 

या घटनेचे सविस्तर वृत्त असे की रविवार दि. 2 मार्च रोजी इयत्ता दुसरीत शिकणारी ऋतुजा व इतर मुले  ही घराजवळ असलेल्या करंजीच्या झाडाखाली खेळत होते त्यावेळी दुपारी 2:30 च्या वेळेस मुले खेळत असलेल्या झाडाखालून ओरडण्याचा आवाज आला म्हणून फिर्यादी व त्याची पत्नी पळत करंजीच्या झाडाकडे गेले त्यावेळी पाहिले असता मुलगी ऋतुजा ही करंजीच्या झाडाला बांधलेल्या झोक्याच्या दोरीत तिच्या गळ्याला दोरीचा पिरगळा बसल्याने त्यात ती अडकली होती तिला बाजूला काढले तेव्हाच तिथे गळ्याला दोरी कचलेले लालसर वन पडलेला दिसत होता म्हणून तिला  खाजगी वाहनाने सांगोला येथील डॉ. जानकर यांच्या श्रीनंद हॉस्पिटल येथे घेऊन गेले असतात तिची एसटी स्टँड जवळ उलटी झाली व तिची हालचाल बंद झाली त्यानंतर डॉ. जानकर यांच्याकडे घेऊन गेले तेथे डॉक्टरांनी तिला तपासून ती मयत झाली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले.

No comments