जारमुळे ग्रामीण भागातील कुंभार व्यवसाय अडचणीत
जारमुळे ग्रामीण भागातील कुंभार व्यवसाय अडचणीत.
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुक्यात ग्रामीण भागात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फ्रिज व जार चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे या जार व फ्रिजमुळे ग्रामीण भागातील कुंभारवाड्यातील माठ व्यवसायाला घरघर लागली दिसून येत आहे .
पूर्वी शहरी व ग्रामीण भागात सर्रासपणे माठातील पाण्याचा पिण्यासाठी वापर केला जात होता .
ग्रामीण भागामध्ये घरगुती, सार्वजनिक समारंभ , हॉटेल व्यवसाय,पाणपोई या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी माठाचा मोठ्या प्रमाणावर दबदबा होता पण काळानुसार लोकांमध्येही बदल होत चाललेला असल्यामुळे लोकांचा घरगुती, सार्वजनिक समारंभ, लग्न सोहळा ईतर कार्यक्रमाच्या ठिकाणी जारच्या मागणीकडे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ग्रामीण भागात
गरीबाचा फ्रिज म्हणून रुबाब असणाऱ्या माठ व्यवसायाला मोठ्या प्रमाणावर घर घर लागल्याने सर्वच गावांमध्ये चालणार कुंभार व्यवसाय आता मोजक्याच गावात तग धरुन आहे .

No comments