Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मारुती बंडगर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड.

मारुती बंडगर यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड. 

वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका अनकढाळ येथील शेतकरी कुटुंबातील मारुती पांडुरंग बंडगर यानी शेती व कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पोलीस उपनिरीक्षक पद मिळवत यश प्राप्त केले.
 त्यांचे पहिली ते चौथी चे प्राथमिक शिक्षण अनकढाळ माध्यमिक शिक्षण नाझरे विद्यामंदिर प्रशालेत 2005 ते 2007 या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण केले तसेच पदवीधर शिक्षण त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक सन 2012 मध्ये पूर्ण केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धेचा अभ्यास 2012 पासून सुरू केला दोन वेळा त्यांनी पीएसआय पदाच्या मुलाखती दिल्या पण त्यांच्या पदरी त्यावेळी निराशा आली पण या अपयशाला खचून न जाता त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले होते शेवटी त्यांना 2023 मध्ये यश मिळाले .
चौकट:
माझ्या यशामध्ये माझ्या पत्नीचा व कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे 2013 व 2017 मध्ये मी पीएसआय पदाची मुलाखत दिली होती पण त्यामध्ये मला अपयश आले होते त्यावेळी माझी पत्नी व माझ्या कुटुंबाने मला आधार दिला व पाठिंबा दिला त्यामुळेच आज मी हे यश पाहत आहे. 
  पीएसआय..
मारुती बंडगर.

No comments