Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत सांगोला महिला कबड्डी संघ विजेता व पुरुष कबड्डी संघ उपविजेता)

 जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धेत सांगोला महिला कबड्डी संघ विजेता व  पुरुष  कबड्डी संघ उपविजेता) 




जिल्हा परिषद कर्मचारी व पदाधिकारी क्रिडा स्पर्धेत सांगोला महिला कबड्डी संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद मिळविले तर पुरुष कबड्डी संघ उपविजेता ठरला.


  सोलापूर येथील नेहरू नगर मैदानावर पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेत सांगोला महिला कबड्डी संघाची कर्णधार मनिषा कोकरे हिने अप्रतिम खेळाचे प्रदर्शन करत अंतिम सामन्यात मोहोळ संघाला धूळ चारली व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हा पुरस्कारही मिळवला.


   मोहोळ संघाविरुद्ध अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात पारडे सातत्याने दोन्ही संघाकडे झुकत  असताना सांगोला संघाची कर्णधार मनिषा कोकरे हिला मोहोळ संघातील तीन खेळाडूंनी पकडले असताना अतिशय चपळाईने त्यांच्या पकडीतून निसटत अंतिम रेषा पार केली व पाच गुण मिळवले.सामना यावेळीच सांगोला संघाच्या बाजूने झुकला.


   या स्पर्धेत सांगोला महिला संघाकडून कर्णधार मनिषा कोकरेला तितकीच दमदार साथ सुधामती गंगणे,सुलताना शेख,राखी सरवदे, वैशाली मोटे, अश्विनी माने,सुवर्णा उन्हाळे,भारती पाटील, लैला गायकवाड,शोभा ठोकळे,शितल लेंडवे, सविता माने या खेळाडूंनी दिली.


   या संघाला आयसीडीएस सांगोलाचे सीडीपीओ मोलाणी साहेब,संघ व्यवस्थापक टकले साहेब,संघ प्रशिक्षक संतोष शर्मा,पर्यवेक्षिका गडहिरे,जांबेनाळ, वाघमारे, देशमुख,सांगोलकर,जाधव व इतर आयसीडीएस स्टाफ यांनी मार्गदर्शन केले.


   सांगोला पुरुष कबड्डी संघानेही दमदार खेळ करत अंतिम फेरीत प्रवेश केला पण अंतिम सामन्यात पंढरपूर संघाच्या अप्रतिम खेळामुळे सांगोला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.


  सांगोला पुरुष कबड्डी संघाचा कर्णधार राजू ताठे यानेही आपल्या कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत संघ अंतिम फेरीत पोहोचवला.अंतिम सामन्यात हाफ टाईमपर्यंत दोन्ही संघ बरोबरीत होते पण त्यानंतर एकावेळी तीन गुण पंढरपूर संघाने मिळवून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवली व सांगोला संघाच्या घशातून विजयाचा घास काढून घेतला.या सामन्यात सांगोला संघाकडून कर्णधारास तितकीच तोलामोलाची दमदार साथ सतीश सपताळ, बापू मिसाळ, दादा ढेंबरे,किरण केदार,रामप्रभू वाघ, अमोल तोडकरी,शिरीष ऐवळे, अमोल लिगाडे, श्रीरंग वाघमोडे, शहाजी इंगोले,भारत हंबीरराव,सिद्धान्ना कोळी, सुभाष इंगवले, श्रीकांत गुळीग यांनी दिली.


  या संघाला सांगोला गटविकास अधिकारी श्री कुलकर्णी साहेब, गटशिक्षणाधिकारी श्री सुयोग नवले साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री भंडारी साहेब यांनी मार्गदर्शन केले.


No comments