Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथील गौण खनिज समितीचे अध्यक्ष रेवन पवार यांचा मित्र परिवारांच्या वतीने पर्यावरण पूरक असा वाढदिवस साजरा.

वाटंबरे येथील गौण खनिज समितीचे अध्यक्ष रेवन पवार यांचा  मित्र परिवारांच्या वतीने पर्यावरण पूरक असा वाढदिवस साजरा.

वाटंबरे /प्रतिनिधी: सांगोला तालुका वाटंबरे येथील गोण खनिज समितीचे अध्यक्ष रेवन पवार यांचा वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने अनावश्यक खर्चाला फाटा देत पर्यावरण पूरक असा साजरा केला.
यावेळी त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने त्यांना वडाचे झाड भेट देण्यात आले तसेच वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते शाल श्रीफळ बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी सरपंच नामदेव पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनाजी पवार, पोलीस पाटील पांडुरंग पवार, यशराज गांडूळ खत प्रकल्प उद्योजक सुरेश पवार, सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे सचिव पत्रकार दत्तात्रय पवार , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भाग्यवान पवार, युवा नेते धीरज पवार, दादासाहेब पवार बाळासाहेब पवार कृष्णदेव पवार गुरुजी भारत पवार अर्जुन पवार उमेश पवार तसेच मोठ्या प्रमाणावर त्यांचा मित्र वर्ग यावेळी उपस्थित होता.

No comments