वाटंबरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा. (शिक्षक संभाजी पवार व हणमंत पवार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.)
वाटंबरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा.
( शिक्षक संभाजी पवार व हणमंत पवार आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित.)
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदलिंगे श्रीराम वस्ती येथे कार्यरत असणारे संभाजी एकनाथ पवार व भोसले मळा(चिणके) येथे कार्यरत असणारे हणमंत पवार या दोन्ही शिक्षकांचा शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सांगोला येथे पंचायत समिती शिक्षण विभाग
यांच्या वतीने दिला जाणारा तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार सांगोला तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले, केंद्रप्रमुख आप्पासाहेब पवार, केंद्र प्रमुख सय्यद काझी तसेच संभाजी पवार व हनमंत पवार यांचे कुटुंब व सहकारी यावेळी उपस्थित होते.




No comments