Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे प्रशालेत इयत्ता बारावी सन 2024 _25 चा निरोप समारोह संपन्न .

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे प्रशालेत इयत्ता बारावी सन 2024 _25 चा निरोप समारोह 



विद्यार्थ्यांनी भविष्यात येणाऱ्या अडचणी व संकटांना तोंड देत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत परिश्रम घ्यावे त्याचबरोबर वाढत्या स्पर्धेबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक आहे . भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी त्यांनी ठेवावी शिरभावी हायस्कूल शिरभावी चे मुख्याध्यापक सूर्यकांत पवार सर हे सांगोल तालुका वाटंबरे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज प्रशालेत शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी बारावी कला या वर्गाचा निरोप समारंभ आयोजित केला गेला होता यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलत होते.

 हा कार्यक्रम प्रशालेचे अध्यक्ष मोहन पवार सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी प्रशालेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षनीय भाषणात मोहन पवार सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी व अनेक संकट यांना तोंड देऊन आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सतत परिश्रम घ्यावे त्याचबरोबर वाढत्या स्पर्धेबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सुद्धा या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी जिद्द, चिकाटी आवश्यक आहे . भविष्यात येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे आव्हान करण्यात आले. या वेळी वाटंबरे गावचे महादेव पवार यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमासाठी प्राचार्या निता पवार ,पर्यवेक्षक शिवशरण सर, खंडागळे सर ,दुबे मॅडम, नितीन घाडगे इत्यादी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तानाजी खंडागळे सर यांनी केले व आभार हनमंत निकम सर यांनी मानले.


No comments