एपीआय मनोज बाबर यांचा पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा.
एपीआय मनोज बाबर यांचा पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा.
वाटंबरे /प्रतिनिधी:
निसर्गात मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड आपणाला कोरोनाच्या कालावधीमध्ये ऑक्सिजनच्या स्वरूपात जाणवली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला पण आज माझ्या वाढदिवसानिमित्त पत्रकार दत्तात्रय पवार वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार, यशराज गांडूळ खत प्रकल्पाचे उद्योजक सुरेश पवार ,पवार उद्योग समूहाचे मालक प्रवीण पवार यांनी आज मला निसर्गामध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणारा वड हा वृक्ष भेट देत माझा वाढदिवस साजरा केला आहे त्यांनी दिलेल्या वडाच्या झाडाची जोपासना करणार असे सांगितले.
वाढदिवसानिमित्त आता मोठ्या प्रमाणावर अनावश्यक खर्च केला जातो या अनावश्यक खर्चाला फाटा देत वाटंबरे गावचे पत्रकार दत्तात्रय पवार, सरपंच नामदेव पवार ,यशराज गांडूळ खत प्रकल्प उद्योगाचे मालक सुरेश पवार, पवार उद्योग समूहाचे मालक प्रवीण पवार यांनी पर्यावरणाला पूरक अशा वडाचे झाड एपीआय मनोज बाबर यांना भेट म्हणून दिले.
यावेळी वाहतूक शाखेचे सर्व कर्मचारी व प्रवीण मिसाळ उपस्थित होते.

No comments