Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा: एपीआय मनोज बाबर.

वाहतुकीचे नियम पाळा अपघात टाळा: एपीआय मनोज बाबर.






वाटंबरे /प्रतिनिधी :
वाहन चालवीत असताना नागरिकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवु नये ,  मोबाईलवर बोलणे टाळावे, सीट बेल्टचा वापर करावा, मोटर सायकल चालवताना हेल्मेटचा वापर करावा ,तसेच सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करावे प्रभारी अधिकारी एपीआय मनोज बाबर हे बुधवार दि. २९ जानेवारी रोजी सांगोला तालुका वाटंबरे येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज  या प्रशालेत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर बोलत होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीता पवार यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती सांगितली . यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्वांनी वाहतुकीच्या नियमाचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली.
रस्ता सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे  एपीआय मनोज बाबर, पत्रकार दत्तात्रय पवार , राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी यांचा प्रशालेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग , व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंटू पवार सर यांनी केले
फोटो: एपीआय मनोज बाबर यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करताना प्रशालेचे प्रयवेक्षक  शिवशरण सर.



No comments