जत्तीवस्ती संख शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
*जत्तीवस्ती संख शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा*
सांगोला प्रतिनिधी
जिल्हा परिषद मराठी शाळा जत्तीवस्ती संख येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 26 जानेवारी 1950 रोजी भारत देशाचे संविधान महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीकडून परिपूर्ण झाले व त्यादिवशी पासून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. सदरचा प्रजासत्ताक दिन हा 76 वा प्रजासत्ताक दिन होता. 75 व्या अमृत महोत्सव वर्षपूर्ती झाल्याने हा संविधान दिन काहीसा खास होता त्यानिमित्ताने शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकाद्वारे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले होते.
प्रथमता शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपस्थित पालक यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . ज्यांच्या हातात परिश्रमाने भारताला संविधान मिळाले असे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.तदनंतर शाळेतील बालचमुंनी विविध कार्यक्रमात भाग घेतला होता. आपल्या भाषणाने उपस्थित श्रोत्यांचे लक्ष या मुलांनी वेधून घेतले तसेच इयत्ता तिसरी व चौथीतील काही विद्यार्थिनींनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांचे प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. तदनंतर उपस्थित मुलांना पालकांकडूनही भरपूर शुभेच्छा होत असलेल्या कार्यक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक शेटे सर व कंत्राटी शिक्षक फुटाणे सर यांचे कौतुक केले.
सदर कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रावसाहेब जत्ती मुख्याध्यापक शेटे सर शिक्षक फुटाणे सर अंगणवाडी सेविका कांबळे मॅडम मदतनीस रेखा जाधव तसेच पालक नामदेव जाधव, प्रेम पाटील , गडदे, ठोंबरे ,मल्लू राठोड श्रीमती ठोंबरे ,दत्ता जाधव तसेच सर्व विद्यार्थी पूर्ण क्षमतेने उपस्थित होते सदरचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व कोणतीही अडीअडचण आल्यास सर्व पालक वर्गाने या पुढील काळात शाळेसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

No comments