२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी वाटंबरे येथे रंगणार बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचा थरार.
वाटंबरे /प्रतिनिधी :
महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये जागृत खंडोबा देवस्थान साठी प्रसिद्ध असलेले वाटंबरे हे आता बैलगाडी शर्यती प्रेमी साठी प्रसिद्ध होऊ लागलेले आहे.
वाटंबरे गावातील जय मल्हार बैलगाडा तरुण मंडळ यांच्या वतीने रविवार दि. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सकाळी ११ वाजता गावातील आबानगर येथील मैदानावर भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे .
या बैलगाडी शर्यतीसाठी जनरल अ गट, जनरल ब गट,आदतगट, घोडागाडी व गावातील गाडी यासाठी प्रथम ,द्वितीय ,तृतीय या क्रमांकासाठी वेगवेगळ्या रक्कमेचे बक्षीस ठेवण्यात आलेले आहे.
या बैलगाडी शर्यतीच्या उद्घाटनासाठी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, मा. आ. शहाजी बापू पाटील, मा. आ. दीपक आबा साळुंखे पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांची उपस्थिती राहणार आहे अशी माहिती जय मल्हार बैलगाडा तरुण मंडळ यांनी दिली तसेच मोठ्या प्रमाणावर सांगोला तालुका व आजूबाजूच्या तालुक्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा व बैलगाडा शर्यती प्रेमींनी या शर्यतीचा आनंद लुटावा असे आयोजकाकडून सांगण्यात आले.

No comments