प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथे शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचे उद्घाटन.
प्राथमिक आरोग्य केंद्र नाझरे येथे शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचे उद्घाटन.
वाटंबरे /प्रतिनिधी:सांगोला तालुका नाझरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शंभर दिवसीय क्षयरोग शोध मोहीमेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन नाझरे गावचे सरपंच संजय सरगर व उप सरपंच सौ. सुवर्णा पाटील , वैद्यकिय अधिकारी डॉ. अजित धायगुडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आरोग्य सेवक अशोक कलाल यांनी क्षयरोग बद्दल माहिती सा़ंगताना शंभर दिवसीय क्षयरोग मोहीम कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त क्षयरुग्ण शोधून उपचाराखाली आणणे, क्षयरुग्णाचा मृत्यू दर कमी करणे, जन जागृती करणे, सन 2025 पर्यंत क्षयमुक्त करण्यासाठीं प्रयत्न करणे.याची उपस्थितीना माहिती दिली. या कार्यक्रमाला आरोग्य सहाय्यक अंकूश वाळके, आरोग्य सहायिका भारती भोसले,प्रयोगशाळा वैधनिक अधिकारी रिता मेश्राम , आरोग्य सेविका श्रीमती.अंजली चंदनशिवे, ताई येलपले औषध निर्माण अधिकारी मोनाली सरगर, आशा गटप्रवर्तक कोमल वाघमारे, संगिता गायकवाड, वाहन चालक सतिश ठोकळे सर्व आशा वर्कर व सर्व नागरिक या वेळी उपस्थित होते.

No comments