Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शिवसेना (शिंदे गट) सोलापूर संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवर दिवसाढवळ्या हल्ला

 शिवसेना (शिंदे गट) सोलापूर संपर्क प्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवर दिवसाढवळ्या हल्ला



 


हल्लेखोर फरार, सागर पाटील हे माजी आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांचे पुतणे 


सांगोला/प्रतिनिधी ः 








महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सागर पाटील यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजणेच्या सुमारास दिवसाढवळ्या हल्ला केला व हल्लेखोर फारार झाले आहेत. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. 



सांगोला शहरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांचे संपर्क कार्यालय आहे. एकनाथ शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख व मा.आमदार अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांचे पुतणे सागर पाटील हे शुक्रवारी दुपारी 3 वाजता त्यांची चार चाकी फॉर्च्युनर गाडी क्र. एम.एच.45 एयु 1929 ही गाडी संपर्क कार्यालयाबाहेर उभी करून अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयात गेले असता, अज्ञात हल्लेखोरांनी अचानक येऊन दिवसाढवळ्या गाडीवर दगडे मारून गाडीच्या पाठीमागील काचा फोडल्या. गाडीत कोणीच नसल्याने कसलीही जीवित हानी झाली नाही. कार्यालयासमोर कशाचा आवाज आला हे बघायला नागरिकांची गर्दी झाली. हल्लेखोर फरार झाले आहेत. ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून पोलीस त्यांचा तपास करीत आहेत. गुंडगिरी, दादागिरी चालू देणार नाही, भयमुक्त तालुका करू अशी घोषणा नूतन आमदारांनी करून आठ दिवस होण्याअगोदरच चक्क सांगोल्यातील माजी आमदारांच्या कार्यालयासमोर हल्ला झाला. त्यामुळे नागरिकांत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान, राज्याचे शिवसेना नेते शंभुराजे देसाई यांनी या हल्ल्याची माहिती घेतली असून तात्काळ हल्लेखोरांना शोधून काढण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे देणार असल्याचे प्रसारमाध्यमांनी सांगितले आहे. 



या घटनेचा तालुकाभर निषेध होत असून पोलिसांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी होत आहे.

No comments