एलके पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा वाटंबरे यांच्या वतीने दिनदर्शिकेचे लोकार्पण.
वाटंबरे /प्रतिनिधी: एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अनिल इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र , कर्नाटक दोन राज्यात ४३ शाखांव्दारे कार्यरत असणारे सांगोला तालुका वाटंबरे येथील शाखेत नविन वर्षाच्या दिनदर्शिकेचा वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या सोहळ्यास सूर्यकांत मिसाळ , शिवाजी लेंडवे,गणपत पवार, सुब्राव पवार, डीसीसी बँक शाखा अधिकारी आदाटे , माजी सरपंच नामदेव पवार , सुरेश पवार,बँक मॅनेजर प्रशांत गोडसे कर्मचारी जितेंद्र शितोळे, विशाल लवटे, शाहरुख काझी, ऋशिकेश काटे , अर्चना मिसाळ व वाटंबरे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर या वेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा