Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात*

*गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मंदिरात श्री दत्त जयंती उत्साहात*
*मोराळे येथील स्वामीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची उपस्थिती* 
सांगोला प्रतिनिधी 
         श्री गुरुदेव दत्तात्रयाचे दुसरे अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्त महाराज मोराळे पेड ता. तासगाव यांच्या दर्शनासाठी विशेष रांगेच्या नियोजनातून लाखो भाविकांनी अनुभवला नेत्रसुखद स्वामी दर्शनाचा अनुभव व अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय, शिवदत्त महाराज की जय या जयघोषाने मोराळे नगरी दुमदुमली. _________________________
      *श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज, दत्त देवस्थान मोराळे पेड ता. तासगाव येथे श्री दत्त जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त सकाळी सहा ते नऊ अभिषेक व आरती, सकाळी नऊ ते दुपारी बारा भजन, दुपारी बारा ते साडेबारा वाजेपर्यंत नामस्मरण व श्री दत्तप्रभूंचे आगमन, आरती पाळणा व ग्रंथ वाचन तसेच दुपारी साडेबारा ते एक भक्ताचे मनोगत व दुपारी एक ते तीन गुरुवर्य भालचंद्र काका व संतोष दादा यांचे प्रबोधन व भक्ताच्या वाढत्या गर्दीमुळे दिवसभर दोन किमी रांगेने लाखो भाविक स्वामी चरणी लीन झाले. यावेळी गुरुवर्य भालचंद्र काका व गुरुवर्य संतोष दादा यांनी लवकरच सात्विक भक्तांच्या मदतीने गुरु नरसिंह सरस्वती महाराजांचे भव्य दिव्य असे मंदिर मोराळे येथे उभारणार असल्याचे सांगितले. तसेच शिवदत्त च्या आरतीचा अनुभव लाखो भाविकांनी घेऊन मंत्रमुग्ध झाले. तसेच माजी सैनिक सेल महाराष्ट्र राज्य प्रमुख दीपक राजे शिर्के व त्यांचे सर्व सहकारी यांनी पाटील काकांना मानपत्र देऊन भव्य सत्कार केला. तसेच उत्सव समितीतर्फे आमदार सुहास बाबर व सौ सोनिया बाबर, तासगावचे पोलीस उपनिरीक्षक विजय गावडे व त्यांचे सहकारी, महावितरणचे कार्यकारी अभियंता सुरेश सवाईराम व त्यांचे सहकारी, भक्त जयंत पवार, कसबे डिग्रज चे गुरुकृपा भजनी मंडळ, सरपंच बाजीराव पाटील, उपसरपंच भारत पाटील, रत्‍नाबाई सुतार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे या सर्वांचा उत्सव समितीतर्फे सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक सचिन गायकवाड तर सर्व स्वामी भक्ताचे आभार सूर्यकांत दादा पाटील व राहुल शिंदे यांनी मानले.

No comments