Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

वाटंबरे येथे खंडोबा यात्रेनिमित्त राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन.

 वाटंबरे येथे खंडोबा यात्रेनिमित्त राज्यस्तरीय शूटिंगबॉल स्पर्धेचे आयोजन.




वाटंबरे /प्रतिनीधी :

महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये प्रसिद्ध असलेले  सांगोला तालुका वाटंबरे येथील जागृत देवस्थान खंडोबा यात्रेनिमित्त  जय मल्हार क्रीडा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे रविवार दि. १५  डिसेंबर रोजी सकाळी ११ ते रात्री १० वाजेपर्यंत  राज्यस्तरीय शूटिंगबॉल चे सामने आयोजित केले गेले आहेत. या सामन्यामधील विजेत्या असणाऱ्या संघांना खालील प्रमाणे बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत प्रथम बक्षीस एकवीस हजार रुपये, द्वितीय बक्षीस पंधरा हजार एक,तृतीय बक्षीस अकरा हजार एक, चतुर्थ बक्षीस सात हजार रुपये, पाच ते आठ या  क्रमांकावरील विजेत्या संघांना चार हजार तसेच वैयक्तिक बक्षीस ही यावेळी मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली आहेत.


या सर्व स्पर्धा गावातील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज वाटंबरे या प्रशालेच्या ग्राउंड वर खेळवण्यात येणार आहेत तरी जास्तीत जास्त या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील, तालुक्यातील संघानी सहभाग नोंदवावा असे आव्हान जय मल्हार क्रीडा आयोजकाकडून करण्यात आले आहे .


No comments