Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

ग्रामपंचायत वाटंबरे यांच्या वतीने सेवानिवृत्त डॉक्टर रज्जाक मुल्ला, ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे, पत्रकार दत्तात्रय पवार यांचा सत्कार.

 ग्रामपंचायत वाटंबरे यांच्या वतीने सेवानिवृत्त डॉक्टर रज्जाक मुल्ला, ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे, पत्रकार दत्तात्रय पवार यांचा सत्कार.



वाटंबरे /प्रतिनिधी:  वाटंबरे ग्रामपंचायतीच्या वतीने  गावातील तरुण होतकरू व विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुरस्कार सन्मानित व्यक्तींचा सत्कार करत त्यांच्या पाठीवर  थाप टाकत त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा देण्याचा  प्रयत्न करावा तसेच गावातील तरुण पिढीने  वाटंबरे गावाचे नावलौकिक करण्याचा प्रयत्न करावा  पत्रकार दत्तात्रय पवार हे  वाटंबरे ग्रामपंचायत यांनी सेवानिवृत्त आरोग्य सेवक रज्जाक मुल्ला  , ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे यांची अनकढाळ या ठिकाणी बदली झाल्याने तसेच महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या सचिव पदी दत्तात्रय पवार यांची निवड झाल्याबद्दल या सर्व मान्यवरांचा  सत्कार समारंभ प्रसंगी  आयोजित केलेल्या कार्यक्रमा वेळी ते बोलत होते .


पुढे ते म्हणाले  कोरोना योद्धा उपाधी मिळाली असे डॉ. रज्जाक मुल्ला यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन   कित्येक वाटंबरे करांचे त्यानी प्राण वाचविले तसेच त्यांचा शांत मित भाषी स्वभावाने ते गावात प्रसिद्ध होते तसेच त्यांनी आपल्या कामाने  वाटंबरे करांना आपलेस केले आहे   आपल्या कामामुळे वाटंबरे मध्ये प्रसिद्ध असलेले  ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्याही कामाची माहिती यावेळी त्यांनी मनोगतात  दिली. तसेच ग्रामपंचायतीने सर्व सत्कारमूर्तींना वृक्ष भेट  देत नवीन उपक्रमाची सुरुवात केली  ग्रामपंचायतीने चालू केलेल्या या नवीन उपक्रमाचे यावेळी त्यांनी कौतुक केले तसेच त्यांनी आरोग्य सेवक रज्जाक मुल्ला, ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .


तसेच यावेळी जलतज्ञ मधुकर पवार यांनीही आपल्या मनोगतात आरोग्य सेवक सेवानिवृत्त डॉ.रज्जाक  मुल्ला व ग्राममहसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी वाटंबरे गावात कार्यरत असताना त्यांनी केलेल्या कामाची माहिती दिली तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला  सत्कारमूर्ती डॉ. रज्जाक मुल्ला, ग्राममहसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत श्रीफळ वाढवण्यात आले तसेच डॉक्टर रज्जाक मुल्ला यांचे गावचे माजी उपसरपंच सुब्राव बापू पवार , उद्योगपती मोहन पवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, फेटा व वृक्ष देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला ,तसेच ग्राम महसुल अधिकारी बाळासाहेब शिंदे यांचा सत्कार माजी सोसायटी चेअरमन नाना बापू पवार , नारायण पवार यांच्या हस्ते शाल,श्रिफळ व वृक्ष देऊन   सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार दत्तात्रय पवार यांचा सत्कार सरपंच नामदेव पवार,जलतज्ञ मधुकर पवार आप्पासाहेब गेजगे ,दिनेश धनवडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ फेटा व  




वृक्ष देऊन करण्यात आला आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावचे माजी सरपंच नामदेव पवार व आभार प्रदर्शन माजी सरपंच किरण पवार यांनी केले .



या कार्यक्रमाला वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार, उपसरपंच मोनिका निकम,नुतन ग्रामसेवक  गुळीक ,माजी सरपंच किरण पवार, माजी उपसरपंच सुब्राव बापू पवार, आरोग्य सेवक डॉक्टर कलाल, मा.सरपंच प्रवीण पवार, सोसायटी चेअरमन खंडू पवार, माजी सोसायटी चेअरमन नाना बापू पवार, माजी सोसायटी चेअरमन अनिल पवार,  उद्योजक मोहन पवार,भाग्यवान पवार ,नारायण पवार, संजय पवार, श्रीधर पवार, एकनाथ पवार, शिवाजी लेंडवे  तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते.


No comments