कोरोना योध्दा आरोग्य सेवक आर आय मुल्ला
[सेवापुर्ती निमित्त आठवणीतील आठवण वाटंबरे गावचे आरोग्य सेवक आर आय मुल्ला ]
एखाद्या काजव्याला सूर्याचे तेज लाभून तो अधिक तेजस्वी होऊन चमकावा त्याच पद्धतीने वाटंबर नगरीमध्ये आपली सेवापूर्ती करणाऱ्या जि प आरोग्य सेवक श्री .आय. आर .मुल्ला यांची आठवणीतील आठवण आज दिनांक 29 11 2024 त्यांचे सेवापूर्ती सोहळा.
मौजे वाटंबरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या गावांमध्ये आरोग्य सेवक म्हणून सन 2016 मध्ये श्री आय आर मुल्ला यांची नेमणूक झाली.वेळेचे बंधन ;कामातील एकाग्रता ,सगळ्यांशी मैत्री पूर्ण व्यवहार ,विनम्रता अशा त्यांच्या अनेक गुणांनी वाटंबरे करांना वेड लावले. कोरोना आपण सर्वांनी अनुभवला. कोरोनाच्या काळामध्ये खरा माणसातला माणूस म्हणून श्री आय आर मला यांच्या ओळख झाली. सूक्ष्म विषाणूच्या गाभ्यातील मरण सोहळा, माणुसकीचे मुखवटे आणि चेहरे या सर्वांची ओळख या काळामध्ये गावाला झाली. कोरोना काळामध्ये ग्रामसेवक एस.आर.मोहिते व आरोग्य सेवक आर.आय.मुल्ला यांनी आपला जीवच गावातील प्रत्येकाचा जीव आहे असे समजून आपल्या कार्याने गावाला प्रेरित केले.
सांगोला तालुक्याला कोरोनाने थोड्या उशिराने गाठले.कोरोना पेशंट येथे सापडले, तिथे सापडले अशा बातम्या एकूण समस्त गावकरी भयभीत व्हायचे. वाटंबरे गावातील बँक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी गुरव साहेब हे कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजतात संपूर्ण गाव शांत झाल्याची अनुभूती आली. बँकेत येणाऱ्या सर्वांची कोरोना टेस्ट झाली. हळूहळू लोक डाऊन झाले बाहेरून येणारे लोकांची टेस्ट होऊ लागली संपूर्ण गाव कोणाच्या भीतीने स्तब्ध झाले. अनेक कर्मचाऱ्यांनी या काळामध्ये आपल्या स्वतःच्या जीवाला प्राधान्य दिले नोकरी सोडून दिल्या. परंतु आरोग्य सेवक आर. आय .मुल्ला यांनी मोठ्या हिमतीने स्वतःचे अश्रू बाजूला ठेवून गावकऱ्यांच्या मदतीला धावून आले.
आले. संपूर्ण वाटंबरे गावाला कोरोनाच्या भीतीने ग्रासले होते. संध्याकाळी झोपताना सकाळी कोणती वाईट बातमी कळेल या भयाने गाव घासले जायचे. या कालावधीत एस आर मोहिते ग्रामसेवक व. आय आर मुल्ला यांच्या मदतीने गावातील मान्यवर ग्रामस्थांच्या मदतीने कोविड सेंटर सुरू केले. सेंटर मधील सर्व पेशंटची काळजी त्यांच्या घरातील मंडळी घेत नसतील तेवढी काळजी आरोग्य सेवक मुला घेत. गावातील लहानापासून वृद्धापर्यंत, महिला व पुरुषांची टेस्ट घेणे, लसीकरण, बाहेरगावहून येणारे व्यक्तींची टेस्ट करणे, त्यांचे विलगीकरण, कोरोना सेंटर मधील बाधित रुग्णांना जेवणापासून ते औषधापर्यंत काळजी घेणारे श्री आर आय मुल्ला व श्री. एस आर मोहिते ग्रामसेवक वाटंबरे गावच्या कुटुंब प्रमुखाची भूमिका अतिशय निर्भीडपणे पार पाडत होते.
गावामध्ये हळूहळू रुग्ण संख्या वाढत होती उद्याचा दिवस आपण पाहू की नाही अशी भीती ठेवून गाव झोपेत जायचा. कोरोना विषयी चर्चा करताना त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून घळाघळा व्हायचे. या महाभयंकर कालावधीमध्ये सुद्धा आपल्या कार्याची निष्ठा ढळू दिली नाही. शासनाच्या सूचनांचे पालन करीत ग्रामस्थांच्या सहयोगाने वाटंबरे गावाला कोरोना विषयी भयमुक्त करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. कोरोना टेस्ट, कोरोना लसीकरण या कामांमध्ये स्वतःला झोकून देऊन काम केले. कोरोना मधून गावाला
झोकून देऊन काम केले. कोरोना मधून गावाला सावरण्यात स्वतःच्या जीवाची स्वतःच्या कुटुंबाची बाजी लावून गाव कोरोना मुक्त करण्यास हातभार लावला. सरकारी कर्मचारी म्हणून नाहीतर गावचा आदर्श सेवक या नात्याने आजपर्यंत कार्य केले. सरकारी सुट्टी असल्या तरी गावचे काम असेल तर आपली टीम घेऊन हजर. त्यांच्यासारखा प्रामाणिक तेच.
आरोग्य सेवक नाही तर गावचा एक आदर्श सेवक या नात्याने प्रामाणिकपणे गावातील कोरोना बाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक, कोविड सेंटरमधील रुग्ण, विलगीकरणातील ग्रामस्थ यांना औषध गोळ्या तर दिल्याच परंतु त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे अद्भुत पूर्व कार्य केले. खरच कोरोना कालावधीत श्री एस आर माहिती ग्रामसेवक व श्री आर आय मुल्ला आरोग्य सेवक यांनी केलेल्या कार्याला गावाचा नेहमी सलाम असेल. अशा या शासनाच्या आरोग्य सेवकाला सेवा पूर्तीच्या निमित्ताने सरपंच ग्रामपंचायत वाटंबरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व समस्त ग्रामस्थ वाटंबरे कर यांच्यावतीने त्यांना पुढील आयुष्य सुखी समाधानी व निरोगीमय लाभो अशी खंडोबा चरणी प्रार्थना करतो.
श्री.बाळासाहेब धोंडीराम धनवडे
मो.क्रमांक ७७०९४८३५५१
0 Comments