Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शेकापच्या बालेकील्ल्यात दिपकआबांचा धमाका...!

शेकापच्या बालेकील्ल्यात दिपकआबांचा धमाका...! 


शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश


सांगोला : तालुका प्रतिनिधी

शेतकरी कामगार पक्षाच्या सांगोला शहरातील चांडोलेवाडी येथील बालेकिल्लाला खिंडार पडले असून असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. शेकापच्या बादल्या किल्ल्यात दिपकआबांच्या नेतृत्वाने धमाका केला असल्याने शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण होत आहे. शेकापमधील मनमानी कारभाराला कंटाळून कार्यकर्ते पक्ष सोडून जात असल्याने पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 
. शेकापमधील हुकूमशाही नेतृत्वाला कंटाळून कार्यकर्ते शेकापला अखेरचा लाल सलाम करीत दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहेत. दिपकआबांच्या नेतृत्वाचा सांगोला शहरातील चांडोलेवाडी येथील शेकापच्या बालेकिल्लात धमाका झाला असून शेकापला खिंडार पडले आहे. चांडोलेवाडी येथील प्रवीण शेंबडे, केराप्पा शेंबडे, योगेश शेंबडे, अवि शेंबडे, अमोल शेंबडे, कैलास शेंबडे, नवनाथ शेंबडे, लहूकुमार शेंबडे, राहुल शेंबडे यांच्यासह शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

No comments