*सांगोला विधानसभा निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज*
* *मतदानासाठी मशीन सिलिंग प्रक्रिया पूर्ण*
सांगोला प्रतिनिधी -
सांगोला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयाकडून जोरदार तयारी सुरू आहे सांगोला 253 विधानसभा मतदारसंघासाठी ३०९ मतदार केंद्र असून त्यासाठी 372 बॅलेट युनिट 372 कंट्रोल युनिट व 402 व्हीव्हीपॅट मशीन उपलब्ध असून सर्व केंद्रावर मतदानासाठी मशीन सिलिंग करून मतदानासाठी सज्ज ठेवल्या आहेत 63 मशीन रिझर्व साठी सज्ज ठेवल्या आहेत मतदानासाठी मशीन सिलिंग प्रक्रिया दिनांक 11 11 /24 व 12 /11 24 या दोन दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात सुरू आहे व आज ही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी भैराप्पा माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष कणसे यांनी सांगितले आहे मतदान मशीन सिलिंग करण्याचे कामासाठी झोनल ऑफिसर ,तलाठी व कोतवाल याप्रमाणे टीम नेमण्यात आली असून त्यांच्यासाठी 34 टेबल ठेवण्यात आले आहेत बॅलेट युनिट कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट पेअरिंग केल्यानंतर एकूण 372 मशीन स्ट्रॉंग रूम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले असून त्या ठिकाणी 24 तास कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवला आल्याची माहिती तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे
0 Comments