Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

करांडेवाडी (बुद्धेहाळ) येथील शेकाप कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

 करांडेवाडी (बुद्धेहाळ) येथील शेकाप कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश




सांगोला : तालुका प्रतिनिधी 


        . दिपक आबा साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील करांडेवाडी (बुद्धेहाळ) येथील शेकापच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसेच विधानसभा निवडणुकीत करांडेवाडी (बुद्धेहाळ) गावातून प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला.

      शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर तालुक्यातील शेकापचे शेकडो कार्यकर्ते दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक असल्याने दररोज शेकापचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याने शिवसेनेचे मजबूत संघटन निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे. सांगोला तालुक्यातील करांडेवाडी (बुद्धेहाळ) येथील माजी उपसरपंच सोपान पांडुरंग निमग्रे, लक्ष्मण काका करांडे, गोरख मारुती करांडे, सिद्धेश्वर सोपान निमग्रे, लालासाहेब नामदेव खट्टे, विष्णू गोरख करांडे, विशाल बाळू बजबळकर, यशवंत पांडुरंग करांडे, पोपट गोरख करांडे, भीमराव सोपान निमग्रे, मच्छिंद्र कृष्णा करांडे, रामचंद्र गोस्ख करांडे, दत्ता दादासो करांडे, रावसाहेब गोरख करांडे, विजय सुखदेव करांडे, बिरूदेव वसंत करांडे, राजू सुखदेव करांडे, विष्णू मच्छिंद्र करांडे, बापू शिवाजी करांडे, राहुल वसंत करांडे, शिवाजी मायाप्पा करांडे, लक्ष्मण शिवाजी करांडे, मारुती शिवाजी करांडे, केराप्पा पांडुरंग करांडे, शंकर शिवाजी निमग्रे, संदीप वसंत करांडे, किरण विष्णू करांडे, विठ्ठल केराप्पा करांडे, दादासो तातोबा करांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. दिपकआबांनी या भागातील ग्रामस्थांची विकासकामे मार्गी लावली आहेत. यापुढील काळातही ते विकासकामांना प्राधान्य देतील, त्यासाठी आम्ही त्यांना विधानसभा निवडणूकीत विजयी करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी दिला.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart