विकास कामाचे न बोलता विरोधक माझ्यावर टीका करतात -आमदार शहाजी बापू पाटील
(शहाजीबापू पाटील यांची ही ऐतिहासिक निवडणूक आहे-श्रीकांतदादा देशमुख )
सांगोला/ प्रतिनिधी-
-स्व .आमदार गणपतराव देशमुख यांनी तालुक्यात 55 वर्षे व दीपकआबांनी सहा वर्षे आमदारकी भोगली. या दोघांनी किती निधी आणला व मी माझ्या पाच वर्षाच्या काळात 5 हजार कोटीहून अधिक निधी आणला याची तुलना जनतेने करावी. मी केलेल्या विकास कामांची शहानिशा करावी. मला विरोध करायचा म्हणून दोन उमेदवार विरोधात निवडणूक लढवत आहेत . महायुती सरकारने राज्यात अनेक महत्वकांक्षी योजना आखून प्रत्येक समाजाला व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे . विरोधक विकास कामाचे न बोलता माझ्यावरती नुसती टीका करतात. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत शहाजीबापू पाटील यांनी तालुक्याच्या उर्वरित विकासासाठी मतदारांनी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारार्थ तालुक्यातील अनेक गावात सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी प्रचारसभा घेण्यात आल्या.उद्याची निवडणूक ही तालुक्याच्या विकासाची व तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून लढवत आहे . महायुती सरकारने शेतकऱ्यांना शेतीपंपाचे विज बिल माफी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना, मुलींसाठी मोफत शिक्षण, महिलांना एसटी प्रवासामध्ये 50 टक्के सवलत, वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत, तसेच तालुक्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न व पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मोठा निधी आणला.
दिघंची ते वाणीचिंचाळे रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यासाठी 450 कोटी रुपये निधीची फाईल प्रस्तावित आहे व शिरसी ते जत दोन तालुक्यांना, जिल्ह्यांना जोडणारा रस्ता काँक्रिटीकरण यासाठी 177 कोटी रुपयांचा निधी आणला असून लवकरच ही कामे सुरू होतील. तालुक्यातील एकही गाव शेतीच्या पाण्यापासून वंचित ठेवले नाही. हे सर्व करूनही विरोधक विकासाच्या मुद्द्यावर न बोलता माझ्यावरती टीका करतात. त्यांना त्यांची जागा मताच्या माध्यमातून दाखवावी व मला पाच वर्षे पुन्हा एकदा आमदारकीची संधी द्यावी असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले
यावेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख म्हणाले, उद्याची विधानसभा निवडणूक ही निर्णायक आहे. ही निवडणूक अटीतटीची असून राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक आहे.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाषभाऊ इंगोले, भाजपचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड. महादेव कांबळे, भीमशक्ती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष विजय बनसोडे, विधानसभा प्रमुख अभिजीत नलवडे, नामदेव भोसले, किरण पाटील ,माणिक भोसले आदींनी आपल्या मनोगतात सांगितले की, सांगोला तालुक्यात टेंभू म्हैसाळ,निरा उजवा कालवा, उजणीचे जया कट्टापुरचं पाणी मंजूर करून घेतले.सर्व कार्यालये एकत्र असावीत म्हणून शहरात तीन मजली प्रशासकीय इमारत, ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय दर्जा दिला, रेस्ट हाऊसचे काम पूर्ण केले.भव्य ईदगाह मैदान उभे केले. सांगोला येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी दिला. कोळा येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी दोन कोटी रुपये निधी दिला. होलार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मंजूर केले. तालुक्यात पाझर तलाव, रस्ते, समाज मंदिरे मंजूर करून अनेक कामे पूर्ण केली .पाच वर्षात सांगोला तालुक्यात केलेली विकास कामे पुस्तकाच्या रूपाने जनतेसमोर ठेवली आहेत. विकास कामाला न्याय देऊन महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताधिकाने विजयी करावे .आमदार शहाजीबापू पाटील नुसते आमदार होणार नाहीत तर ते नामदार म्हणून तालुक्यामध्ये येतील. तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. चंद्रभागा नदीचे पाणी शिरभावी योजनेच्या माध्यमातून तालुक्याला मिळाले. जलसंपदा विभागात मी मंजूर केलेल्या पाण्याचे जीआर तपासून पहा. तालुक्यातील 95 हजार शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यासाठी कोट्यावधी रुपयाचा पिक जळीताचा निधी दिला. इतर कोणत्याही तालुक्याला असा निधी मिळाला नाही. आमदार शहाजीबापू पाटील ह विकास पुरुष असून ते पाणीदार आमदारही आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांना विक्रमी मताने विजयी करून नामदार करूया असे आवाहन मान्यवरांनी बापूंच्या प्रचार सभेत केले.
सांगोला तालुक्यातील वाकी ,हलदहिवडी, शिरभावी, धायटी, चिंचोली, बामणी, देवळे, सावे, मेथवडे,संगेवाडी या गावामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेण्यात आल्या. सभेसाठी पोलीस पाटील साहेबराव पाटील, श्रीकांत जाधव, बलवडीचे उपसरपंच विकास मोहिते, रामस्वरूप बनसोडे ,श्रीनिवास साळुंखे, तात्यासाहेब उबाळे ,संतोष साळुंखे ,शंकर साळुंखे यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments