Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मांजरी (देवकतेवाडी) येथे शहाजीबापू गटाला धक्का..

 मांजरी (देवकतेवाडी) येथे शहाजीबापू गटाला धक्का..!



कट्टर कार्यकर्त्यांचा दिपकआबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश



सांगोला : तालुका प्रतिनिधी 


       शहाजीबापू गटातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून तसेच पक्ष नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला कंटाळून सांगोला तालुक्यातील मांजरी (देवकतेवाडी) येथील शहाजीबापू गटाच्या कट्टर कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून मशाल हाती घेतली. मांजरी (देवकतेवाडी) येथील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने शहाजीबापू गटाला खिंडार पडले आहे.

     विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सांगोला तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दिपकआबा साळुंखे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सांगोला तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष आणि शहाजीबापू गटामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकापसह शहाजीबापू पाटील गटाला सोडचिट्टी देत आतापर्यंत हजारो कार्यकर्त्यांनी दिपकआबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवेश करून मशाल हाती घेतली आहे. 

      मांजरी (देवकतेवाडी) ता.सांगोला येथील दामोदर शंकर शिनगारे, बलभीम किसन शिनगारे यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी सरपंच सचिन शिनगारे, अशोक शिनगारे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष रंगनाथ दाजी पाटोळे, नवनाथ शिनगारे, विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन उत्तम पवार, युवा नेते अनिल शिनगारे, मधुकर फाटे, कालिदास शिनगारे, संभाजी कांबळे यांच्यासह देवकतेवाडी व मांजरी येथील असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी दिपकआबा साळुंखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याची ग्वाही दिली.


No comments