*अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर संदीप कोहिनकर यांची 253 सांगोला विधानसभा मतदारसंघात भेट*
सांगोला प्रतिनिधी - सांगोला विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद सोलापूर येथून संदीप कोहिनकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी भेट देऊन पंचायत समितीमध्ये सर्व खाते प्रमुख शिक्षण, आरोग्य, आयसीडीएस, बांधकाम , पाणीपुरवठा, लपा, या विभागातील खातेप्रमुकांची विधानसभा निवडणूक कामी सभा घेऊन विधानसभा अंतर्गत मूलभूत सुविधा बाबत आढावा घेतला पिण्याचे पाणी, महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र शौचालय व्यवस्था,हिरकणी कक्ष,लाईट व्यवस्था,फर्निचर ईत्यादी बाबत सुचणा दिल्या
त्यानंतर जिल्हा परिषद शाळा पुजारवाडी व ग्रामपंचायत मेडशिंगी येथील मतदान केंद्राची पाहणी केली असता मतदानाचा टक्का वाढवणे बाबत सूचना दिल्या व तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रे आदर्श मतदान केंद्र करणे बाबत सक्त सूचना देण्यात आल्या त्यावेळी त्यांचे सोबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे तथा गटविकास अधिकारी पंचायत समिती सांगोला, उपअभियंता बांधकाम बाळासाहेब नकाते, उपअभियंता पाणीपुरवठा सेनापती केदार विस्तार अधिकारी पंचायत अमोल तोडकरी उपस्थित असल्याचे मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितले आहे
0 Comments