Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

दिपकआबांना आमदार करा, सांगोला तालुक्यातील सर्व वाहनांना अनकढाळ टोलनाका मोफत करून देणार

दिपकआबांना आमदार करा, सांगोला तालुक्यातील सर्व वाहनांना अनकढाळ टोलनाका मोफत करून देणार 



लहुजी पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांचे वाहनधारकांना आवाहन



सांगोला: तालुका प्रतिनिधी 


आतापर्यंत अनेक आंदोलने करून अनकढाळ टोलनाक्यावर जड अवजड वाहनांना ५० टक्के सवलत देण्यात यश आले आहे. तसेच सांगोला तालुक्यातील वाहनांना पासची सवलत देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांना प्रचंड मतांनी विजयी करून सांगोला तालुक्यातील सर्व वाहनांना अनकढाळ टोलनाका मोफत करून देणार असल्याचे लहुजी पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी सांगितले. 


       यावेळी बोलताना लहुजी पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी सांगितले की, सांगोला तालुक्यातील वाहनांना अनकढाळ टोलनाक्यावर टोलमाफी मिळावी यासाठी अनेक रास्ता रोको आंदोलन केले आहेत. या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे. सांगोला तालुक्यातील सर्व वाहनधारकांना 
अनकढाळ टोलनाक्यावर टोलमाफी मिळावी यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबांना आमदार करणे गरजेचे आहे. गोरगरीब, दीन दलित, वंचित, उपेक्षित समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी दिपकआबा १८-१८ तास काम करीत आहेत. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवण्यासाठी तालुक्यातील सर्व वाहन धारकांनी सज्ज राहावे. समाजासाठी दिवसातील १८-१८ तास वेळ देणारा लोकनेता अशी दिपकआबांची ओळख आहे. सांगोला तालुक्यातील सर्व जड, अवजड वाहनधारकांनी दिपक आबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे आणि दिपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन लहुजी पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी केले आहे. 



(
लहुजी पँथर सेना दिपकआबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी - संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे

सांगोला तालुक्याच्या हक्कासाठी लढा देणारे महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या पाठीशी लहुजी पँथर सेना खंबीरपणे उभी राहिली आहे. सर्व कार्यकर्त्यांनी दिपकआबांना आमदार करण्याचा निर्धार व्यक्त केला असून तालुक्यातील सर्व समाजाचा दिपकआबांना पाठिंबा वाढत आहे. अशावेळी वंचित, उपेक्षित समाजाला न्याय देणाऱ्या दिपकआबांना यंदा आमदार करणारच असा विश्वास लहुजी पँथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ रणदिवे यांनी व्यक्त केला.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart