Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

 श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.



वाट़बरे /प्रतिनिधी:

श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज वाटंबरे या प्रशालेत गुरुवार दि.२१ नोव्हेंबर  रोजी   १९९९ -२००० या वर्षात शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा  स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. तब्बल २४ वर्षानंतर होणाऱ्या भेटीची सर्वांना  आतुरता होती आपली शाळा आपण बसत असलेला वर्ग, बेंच  शिक्षकांना मोठेपणी प्रत्यक्ष अनुभवताना मिळणारा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. भूतकाळातील मातीचे ढिगार्‍याखाली दडलेले आठवणीचे माणिक मोती, घड्याळाचे काटे मागे सरकवत शोधताना आनंद अवर्णनीय होता .खूप वर्षातून होणाऱ्या भेटीगाठीतून एकमेकाविषयी असणाऱ्या कटू ,गोड आठवणी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्या .

प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर  कर्मचारी वर्गाशी  विद्यार्थ्यांनी त्यांनी संवाद साधला. प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष कै .दा .सू. पवार सर यांनी ग्रामीण भागातील मुलांसाठी केलेले शैक्षणिक कार्य त्यांच्या आठवणींना उजाळा दिला तर भविष्यकाळात वाटंबरेच्या पंचक्रोशी वर इतिहास लिहिला गेला तर त्यात पवार सरांचे कार्य व नावाची नोंद घेतली जाईल असे माजी विद्यार्थी व सध्याचे य. मंगेवाडी चे  माजी सरपंच दत्तात्रय मासाळ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.निता पवार  यांनी आपल्या प्रास्ताविकामधून माजी विद्यार्थ्यांना संबोधित केले जीवन जगताना शालेय जीवनातील अनुभव किती उपयुक्त ठरतात जुन्या आठवणींना दिलेला उजाळा हा जगण्यासाठी बळ देणारा व प्रेरणादायी आहे धावपळीच्या जीवनात एकमेकांना भेटणे दुरापास्त होत असताना आपल्या अनमोल वेळ आपल्या लोकांसाठी देणे किती आवश्यक आहे याचेही महत्व मुख्याध्यापिका निता पवार  यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

ग्रामीण भागात असूनही आपली गुणवत्ता प्रशालेने टिकून ठेवली आहे. प्रशालेतील ज्ञानाच्या बळावर उंच भरारी घेणाऱ्या मुलांची संख्या खूप असल्याने दादासो पवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले .या शाळेत शिक्षक घेणारे असंख्य विद्यार्थी आज वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायात नावलौकिक मिळवताना दिसून येतात ही परंपरा अशीच पुढे चालत राहावी अशी अपेक्षा त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

माजी विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या शिक्षकांचा पुष्पहार घालून सत्कार केला तसेच विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती शाळेला भेट म्हणून दिली. शाळेत स्नेह मेळाव्यास  परवानगी दिल्याबद्दल विद्यार्थ्यांनी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  प्रशाले कडून  सर्व माजी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी .डी. पवार सर यांनी केले या प्रशालेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे असणारे ऋणानुबंध असेच वृद्धिगत करण्याच्या आव्हान त्यांनी केले तसेच प्रशालेत आलेले सर्व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले खूप आनंदी वातावरणात हा स्नेह मेळावा संपन्न झाला.


Post a Comment

0 Comments