*सांगोला पुणे गाडीचे नाझरे येथे जंगी स्वागत*
*सुरक्षेतेसाठी एसटीनेच प्रवास करा.. जिल्हाध्यक्ष कुमार नरखडे*
नाझरे प्रतिनिधी
नाझरे व परिसरातील प्रवाशांची म्हसवड गोंदवले व पुणे येथे जाण्यासाठी गैरसोय होत असल्याने, या भागातून एसटी सुरू व्हावी यासाठी सांगोला तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रविराज शेटे, झाडबुके गुरुजी व तातोबा वाघमारे यांनी पाठपुरावा केला व त्यास अखेर यश मिळाले. परंतु प्रवासी वर्गाने सुरक्षेतेसाठी एसटीनेच प्रवास करावा व आज ही गाडी सुरू झालेली आहे या कामी डेपो मॅनेजर विकास पोकळे यांचे फार मोठे सहकार्य लाभले असे मत जिल्हाध्यक्ष कुमार नरखडे यांनी नाझरे ता. सांगोला येथे एसटी पूजन प्रसंगी व्यक्त केले.
सुरुवातीस एसटीचे पूजन सांगोला येथे आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, अच्युत फुले, संतोष महिमकर, कुमार नरखडे , अधीक्षक पृथ्वीराज पारसे, वाहतूक निरीक्षक समाधान काशीद, पत्रकार अशोक बनसोडे, वाहक वसेकर यांच्या शुभहस्ते तर नाझरे येथे सरपंच संजय सरगर, मा. उपसभापती सुनील चौगुले, मा. सरपंच हनुमंत सरगर, युवा नेते नितीन रणदिवे, बंडू मामा आदाटे व पत्रकार रविराज शेटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच यावेळी माजी उपसभापती सुनील चौगुले, कुमार नरखडे, रविराज शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. व एसटी चालक अमोल बंडगर, वाहक उल्हास स्वामी, अध्यक्ष रविराज शेटे, कुमार नरखडे, शंकर बंडगर यांचा सत्कार करण्यात आला.
सदर प्रसंगी माजी उपसरपंच गणीसो काजी, विजय गोडसे, शशिकांत पाटील, अरुण रायचुरे, पापा काजी, लक्ष्मण ढोबळे, डिके वाघमारे, गोरख भाऊ आदाटे, मा. मुख्याध्यापक प्रकाश परिचारक, एकनाथ जावीर, पोपट सरगर, बंडू नदाफ, बंडू काकडे, शरद गुरव, संतोष सोनार, नारायण मिस्त्री, दौला बंडगर सावकार, ग्रामस्थ, प्रवासी उपस्थित होते. शेवटी वाहक एन. बी. वसेकर यांनी आभार मानले.
0 Comments