Ad Code

 

Ticker

6/recent/ticker-posts

सांगोला महाविद्यालयात अविष्कार रिसर्च महोत्सव - 2024 उत्साहात संपन्न

 सांगोला महाविद्यालयात अविष्कार रिसर्च महोत्सव  - 2024  उत्साहात संपन्न



सांगोला / प्रतिनिधी:


      सांगोला तालुका उच्च शिक्षण मंडळ संचलित, सांगोला महाविद्याल सांगोला आयोजित अविष्कार रिसर्च महोत्सव 2024  मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे उद्घाटन पाहुणे प्रा. संभाजी शिंदे, प्रा.संतोष माने, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. शुद्धोदन कदम, महाविद्यालयातील इंग्लिश विभाग प्रमुख डॉ.अर्जुन मासाळ  यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महाविद्यालयातर्फे करण्यात आला.


      अविष्कार रिसर्च महोत्सव 2024  कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत डॉ. अमोल पवार यांनी अविष्कार रिसर्च महोत्सव स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू सांगून, या महोत्सवाचा थोडक्यात आढावा सादर केला. डॉ. गणपतराव महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना आजच्या जगात  माहिती तंत्रज्ञान हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा अविभाज्य घटक बनला असून त्यातून विद्यार्थ्यांनी विषयातील नवनवीन कल्पना, नाविन्यपूर्णता अभ्यासून त्यातून  पेटंट्स घ्यावेत, विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये उच्च दर्जाची रोजगार क्षमता व उद्योजकता निर्माण करावी असे आव्हान यावेळी करण्यात आले. संशोधक वृत्तीमुळे तरुण पिढी आत्मनिर्भर बनवू शकते असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी पाहुणे डॉ. गणपतराव महाविद्यालयाचे  प्रा. संभाजी शिंदे म्हणाले की विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात अशा स्पर्धेत भाग घेतल्यास त्यांच्यातील सुप्त गुणांचा, संशोधक वृत्तीचा आत्मविश्वास वाढवून भविष्यामध्ये असे विद्यार्थी त्यांच्या करिअरमध्ये खूप उंच भरारी घेतात.


      कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना डॉ. अर्जुन मासाळ म्हणाले की विद्यार्थी शिकत असताना जे  ज्ञान संपादन करतो ते त्याच्या भविष्यकालीन करिअर डेव्हलपमेंट साठी महत्त्वाचे ठरते. अविष्कार रिसर्च महोत्सव 2024  अंतर्गत पोस्टर्स, मॉडेल्स व लाईव्ह डेमोस्ट्रेशन इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते वरील सर्व स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून आपल्या ज्ञानाचा व तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट असे यश संपादन केले. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.


      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले, समन्वयक डॉ. अमोल पवार, आय. क्यू. ए. सी. कोऑडीर्नेटर डॉ. राम पवार, रिसर्च डेव्हलपमेंट कक्षाचे संचालक डॉ. प्रकाश बनसोडे, आविष्कार रिसर्च कमिटी सदस्य डॉ. विधीन कांबळे, डॉ. मालोजी जगताप, प्रा. राहुल खरात, श्री. विलास माने. सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका सौ. भाग्यश्री पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी कार्यालयीन अधिक्षक श्री. प्रकाश शिंदे, तसेच श्री. बाबासो इंगोले, श्री. प्रदीप आसबे व श्री.महादेव काशीद  यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते. पोस्टर, मॉडेल प्रदर्शन करण्यासाठी डॉ. जमीर तांबोळी, डॉ.मच्छिंद्र वेदपाठक, प्रा. ओंकार घाडगे, डॉ. सदाशिव देवकर, प्रा. जगदीश चेडे  व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


शेततळ्यातील पाण्याचे शुद्धीकरण- कु. दिघे कोमल (बी.एस्सी.1 )  सततच्या साठवणुकीमुळे शेततळ्यातील पाणी दूषित होते उन्हाळ्यात पाणी पातळी फार कमी होते त्यामुळे आपण पिके घेऊ शकत नाही म्हणून या पाण्याचे शुद्धीकरण करून आपण शेतासाठी पर्याय म्हणून त्याच पाण्यात मत्स्य पालन करू शकतो तसेच दूषित पाण्यामुळे पिकांना परिणाम होतो पाण्याच्या शुद्धीकरणामुळे पिकांवर चांगला परिणाम होतो यासाठी हे यंत्र कमी खर्चामध्ये अतिशय चांगले काम करते. या प्रकल्पासाठी मला मार्गदर्शक म्हणून डॉ. विधीन कांबळे सर प्रा. अशांत भोसले सर  यांची मदत झाली. माझा प्रकल्प सादरीकरण करण्यासाठी आविष्कार रिसर्च महोत्सव सारखा मोठा प्लॅटफॉर्म सांगोला महाविद्यालयाने उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी महाविद्यालयाचे मनापासून आभार मानते.


 


      संशोधनामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होते. संशोधन म्हणजे ज्ञानाचा  शोध घेणे. कोणत्याही समस्या शास्त्रोक्त पद्धतीने कशी सोडवावी हे संशोधन दर्शवते. विद्यार्थ्यांची जिज्ञासा आणि चौकस वृत्ती ही नैसर्गिक देणगी आहे. याच वृत्तीमुळे  त्यांची ज्ञानाची तहान वाढते. निसर्गात घडणाऱ्या घटनांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून मागवा घेत घेत, प्रसंगी चुका आणि शिका यांच्या वापरानंतर तो इष्ट ध्येयच्या दिशेने शास्त्रशुद्ध पद्धतीने  काम करतो........प्रा. डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, सिनेटर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख,डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला.



 






स्पर्धेतील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे:


१. ह्युमॅनिटीज, लैंग्वेजेस, फाईन आर्ट: अंडर ग्रॅज्युएट विजेता कु.ठोकळे भगवती उपविजेता कु. श्रावणी धुकटे, श्री. शिवशंकर खरात पोस्ट ग्रॅज्युएट विजेता कु.ज्योती राठोड उपविजेता कु. राधिका खरखंडे पोस्ट पीजी (पीएचडी) विजेता  मिस. पाटील भाग्यश्री उपविजेता श्री. गोडसे प्रशांत.


२. कॉमर्स, मॅनेजमेंट, लॉ: अंडर ग्रॅज्युएट विजेता श्री.  भागवत निरंजन, उपविजेता कु. देवळे शिवानी


३ . प्युअर सायन्स- अंडर ग्रॅज्युएट विजेता कु. दिघे कोमल उपविजेता कु.लिगाडे स्नेहा पोस्ट ग्रॅज्युएट विजेता कु.कोडग एस. एस., कु. पेटकर एस. ए., कु. जगताप टी. ए., श्री.  शेख डी. आर. श्री. उमदी एल.बी.


४. एग्रीकल्चर अँड अनिमल हसबंडरी: अंडर ग्रॅज्युएट विजेता श्री.  मुलानी झिसन उपविजेता विभागून  कु.अंबिका कमले, कु. साक्षी बोत्रे,  कु.संजना साळुंखे, कु.शितल काशीद व कु. माने जयश्री, कु. भोसले स्वराली, श्री. आदेश टकले


५. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी: पोस्ट ग्रॅज्युएट मिस.वगरे सोनाली कु. महांकाळ ऋतुजा पोस्ट पीजी (पीएचडी)  मिस्टर घाडगे ओंकार


६.मेडिकल अँड फार्मसी: पोस्ट ग्रॅज्युएट विजेता कु.बुंजकर पी.पी., कु. काशीद एस. एन., श्री.  पीरगोंडे, मिस्टर अमोल झुरळे, श्री. पाटील कुलदीप पोस्ट पीजी (पीएचडी) श्री.  आतिश पवार.


या सर्व स्पर्धेचे परीक्षण प्रा. संभाजी शिंदे, प्रा.संतोष माने, डॉ. राजेंद्र सूर्यवंशी डॉ. शुद्धोदन कदम यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्रकाश बनसोडे यांनी केले.

Post a Comment

0 Comments