Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १६ ऑगस्ट, २०२४

चोपडी येथे विविध ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.

चोपडी येथे विविध ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न.


सांगोला /प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील चोपडी येथे 15 ऑगस्ट रोजी देशाच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. चोपडी येथील बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये सुभेदार अमोल कृष्णा बाबर यांच्या शुभहस्ते व कार्यरत सैनिक ज्योतीराम सपताळ व दीपक जगताप यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाअध्यक्ष डॉ. आनंदराव बाबर हे होते. 
यावेळी सुभेदार अमोल बाबर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक थोर महापुरुष व वीर पुरुषांनी प्राणाचे बलिदान दिले. महापुरुषानी देशासाठी सर्वस्व अर्पण केले. आज आपला देश अनेक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. प्रत्येकाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणे गरजेचे आहे. अतिरेकी शक्तीच्या विरोधात देशाचे सैन्यदल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. यावेळी सोसायटीचे चेअरमन भिकाजी बाबर यांनी देशातील तरुण पिढीवर देशाचे भवितव्य व प्रगती अवलंबून असून जय जवान जय किसान हा नारा सर्वत्र पोहोचला पाहिजे . भिकाजी बाबर यांनी बाळासाहेब देसाई विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहिल्या तीन क्रमांकासाठी बक्षीस देऊन प्रेरित केले. यावेळी माजी उपसरपंच ज्ञानेश्वर बाबर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक के. डी. बाबर म्हणाले 15 ऑगस्ट हा देशाचा राष्ट्रीय सण आपण साजरा करीत असताना मनस्वी आनंद होत आहे. आज आपला देश अनेक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. आनंदराव बाबर म्हणाले ,आम्ही विकास एज्युकेशन सोसायटी संचलित, बाळासाहेब देसाई विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय उभारून गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय केली. ज्ञानदानाचे पवित्र कार्य आज अखंडपणे चालू आहे याचे समाधान आहे. आज प्रशालेमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असल्याचे पाहून समाधान व्यक्त केले .यावेळी शालेय विद्यार्थी, विद्यार्थ्यांनीनीआपले मनोगत व्यक्त केले .त्यांना मान्यवरांकडून बक्षीस देण्यात आले . कार्यक्रमासाठी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. बी. बाबर सर यांनी केले. उपस्थितांचे आभार जनार्धन बाबर सर यांनी मानले.
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा चोपडी येथे सुभेदार अमोल बाबर , कार्यरत सैनिक दीपक जगताप, ज्योतीराम सपताळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील मान्यवर, उपसरपंच पोपट यादव, चेअरमन दगडू बाबर बाळासाहेब बाबर फौजी , ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मिसाळ ग्रामपंचायत सदस्य ,शाळेचे मुख्याध्यापक पवार, शिक्षक - शिक्षिका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव यादव, व सदस्य उपस्थित होते. यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम व मनोगतही व्यक्त केले. अंगणवाडी ,प्रशाला तसेच बाळासाहेब देसाई विद्यालयातील विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी देश गौरवपर घोषणा देत महापुरुषांच्या स्मृतींना उजाळा दिला. 
ग्रामपंचायत कार्यालय चोपडी येथे सरपंच मंगलताई सरगर, यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते. 15 ऑगस्ट निमित्त विविध ठिकाणींच्या आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये सरपंच मंगलताई सरगर ,उपसरपंच पोपट यादव, तसेच ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामविकास अधिकारी एम .व्ही.मिसाळ, चेअरमन भिकाजी बाबर ,चेअरमन दगडू राजाराम बाबर, सोसायटी सदस्य किसन बाबर ,,सेवानिवृत्त सैनिक महादेव वाघमारे ,सुरेश बाबर ,सेक्रेटरी सुनील बाबर ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय. एस. बाबर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक रामचंद्र केंगार, माजी मुख्याध्यापक नंदकुमार केंगार, सेवानिवृत्त सैनिक बाळासाहेब बाबर, सेवानिवृत्त शिक्षक शंकर केंगार ,ग्रामपंचायत सदस्य अनिल जगदाळे, ग्रामपंचायत सदस्य दिनकर बाबर, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत डोंगरे, ग्रामपंचायत सदस्य विनायक तोरणे, सदस्य संजय खंडागळे, तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, मान्यवर, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart