झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आदर्श माता पिता सन्मानपत्र वितरण:रमेश कांबळे
झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे आदर्श माता पिता सन्मानपत्र वितरण:रमेश कांबळे
पुणे: प्रतिनिधी : डॉ. रमेश शंकरराव कांबळे हे गेली सुमारे 50 वर्ष वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत प्रथम त्यांनी शिरवळ जिल्हा सातारा येथे स्वतःचा दवाखाना चालू केला त्यावेळी त्यांनी तेथील गरीब रुग्णांना अल्प दरात चांगली सेवा दिली त्यामुळे तेथे ते गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि त्यामुळे तेथील ग्रामस्थ सरपंच व सभापती यांनी तेथील सरकारी दवाखान्यात मेडिकल ऑफिसर इन्चार्ज म्हणून घेतले तेथेही त्यांनी चांगले काम करून लोकप्रियता वाढविली थोडा वर्षानंतर या नोकरीचा राजीनामा देऊन काही वर्ष त्यांनी स्वतःचा दवाखाना चालू केला त्यानंतर गेली 24 वर्ष ते पुणे येथील नामांकित जनकल्याण रक्तपेढी येथे मेडिकल ऑफिसर पासून डेप्युटी इन चार्ज पदापर्यंत पोहोचले व सध्या तेथे ते कन्सल्टंट म्हणून काम पाहत आहेत.
रमेश कांबळे सर व त्यांच्या पत्नी उज्वला कांबळे यांच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त झेप फाउंडेशन पुणे यांच्याकडून आदर्श माता व पिता सन्मानपत्र वितरण करण्यात आले यावेळी माजी ACP रमाकांत खरात सर , झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्याच्या खडकवासला विधानसभा सचिव रूपाली सुहास खरात मॅडम , ओमकार खरात व खरात परिवार व कांबळे परिवार मोठे संख्येने उपस्थित होते




No comments