राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी निवारा शेडची अवस्था असून अडचण नसून खोळंबा.
राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी निवारा शेडची अवस्था असून अडचण नसून खोळंबा.
वाटंबरे /प्रतिनिधी: रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गा वरती प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेले प्रवासी निवारा शेडची अवस्था "असुन अडचण नसुन खोळंबा "या म्हणी प्रमाणे झाली आहे.
रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासासाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी निवाऱ्याची सोय करण्यात आलेली आहे पण उभारण्यात आलेले प्रवासी शेडचा प्रवाशांसाठी त्याचा उपयोग होतो का? हे पाहण्यासारखे झालेले आहे. उभारण्यात आलेले प्रवासी शेड हे कोणत्या तत्त्वाशी धरून आहेत प्रवासी शेड उभा करताना राज्य परिवहन महामंडळाला विचारात घेतले गेले का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. राष्ट्रीय महामार्गावरती गाव तिथे उड्डाणपूल या तत्त्वाचा वापर केला गेल्याने त्या ठिकाणी सर्व्हिस रोडची निर्मिती केली गेलेली आहे आहे. त्या सर्विस रोड वरती प्रवासी निवारा शेडची सोय करण्यात आलेली आहे पण खरंच त्या प्रवासी निवारा शेडचा प्रवासासाठी उपयोग होतो का हे पाहण्यासारखे झालेले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या सर्व बसेस सर्विस रोड वरून न येता उड्डाण पुलावरून जात असतात त्या मूळे सर्विस रोड वरती उभा करण्यात आलेले प्रवासी निवारा शेड कोणासाठी उभा केले गेले आहेत हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे सर्विस रोड वरती उभारण्यात आलेले प्रवासी निवारा शेड ज्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी असेल तिथे असले पाहिजे पण ते त्या ठिकाणी नसून ते दूरच्या अंतरावर उभे केले गेलेले आहेत .
![]() |
| उन्हामध्ये एसटीची वाट पाहत बसलेली प्रवासी |
राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या सर्व बसेस उड्डाणपुला वरुण जात असल्याने प्रवाशांना उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूच्या टोकावरती उन्हामध्ये किंवा पावसामध्ये बसेसची वाट पाहत बसावे लागते.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी राज्य परिवहन महामंडळाशी समन्वय साधून प्रवासी निवारा शेड उभा करणे गरजेचे होते पण तसे न केले गेल्याने राष्ट्रीय महामार्गावरती उभारण्यात आलेले प्रवासी निवारा शेड हे असून अडचण नसून खोळांबा या म्हणी सारखे त्याची परिस्थिती झालेली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व राज्य महामार्ग परिवहन मंडळ यांनी समन्वय साधून ज्या ठिकाणी प्रवाशांची गर्दी आहे त्या ठिकाणी प्रवासी शेडची सोय करावी अशी प्रवाशातून मागणी होत आहे.
चौकट: {आम्ही एक तास उन्हामध्ये एसटीची वाट पाहत बसलो आहे अजून देखील एसटी आलेली नाही या ठिकाणी बसण्यासाठी प्रवासी निवारा शेडची सोय केलेली नाही.




No comments