Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

आरोग्य हीच खरी संपत्ती : डॉ. शिवाजीराव ढोबळे.

 आरोग्य हीच खरी संपत्ती  : डॉ. शिवाजीराव ढोबळे. 

डॉ.शिवाजीराव ढोबळे 


नाझरे प्रतिनिधी

                दुपारी रखरखते आणि रात्री उष्णतेच्या झळा याचा सामना लहानापासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच करावा लागत आहे व उखाड्याने आरोग्याच्या तक्रारीत वाढ होत चालली आहे यासाठी प्रत्येकाने काळजी घेऊन शक्यतो दुपारी बारा ते तीन पर्यंत प्रवास टाळा व उन्हापासून बचाव करण्यासाठी स्वतःची काळजी घ्या व आरोग्य हीच खरी संपत्ती आहे ती जतन करा असे मत डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी आरोग्य दिनानिमित्त संजीवनी हॉस्पिटल बलवडी येथे व्यक्त केले.


          कडक उन्हामुळे चक्कर येणे, उष्माघात असे आजार उद्भवतात यासाठी दुपारी फिरणे बंद करा व डोक्यावर टोपी, गॉगल, शूज याचा वापर करा तसेच मद्यपान, चहा, कॉफी टाळा व नारळ पाणी, उसाचा रस, सरबत, फळे व पाणी याचा वापर वाढविणे गरजेचे आहे, तसेच उन्हाळ्यात जांभळे खावा कारण त्यामध्ये अँटी आ्‌‌क्सीडेंट असतात व शरीरात शुद्ध रक्ताचे प्रमाण वाढते व साखर कमी होते. याचबरोबर जेवणामध्ये ताज्या गोष्टीचा समावेश करा व अधिकाधिक पाणी, ताक पिणे गरजेचे आहे व दिवसभर पाणी प्या व आरोग्य सांभाळा असा मौलिक सल्लाही डॉक्टर शिवाजीराव ढोबळे यांनी यावेळी दिला.

No comments