शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचा विधर्भातील संपर्क संवाद दौरा पूर्ण..मराठवाड्यात दौरा सुरू*.-.भाई दिगंबर कांबळे.
*शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकऱ्यांचा विधर्भातील संपर्क संवाद दौरा पूर्ण..मराठवाड्यात दौरा सुरू*.-.भाई दिगंबर कांबळे.
नाझरे प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्ग बाधीत विधर्भ ,मराठवाडा, पश्चीम महाराष्ट्र, कोकण , विभागातील 12 जिल्ह्यातील 39 तालुक्या मधील बाधीत शेतकऱ्यांना एकजूट करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष, नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती चे वतीने राज्यव्यापी दौरा..
शक्तीपीठ महामार्ग करणेसाठी राज्य सरकारने 28 फेब्रुवारी 2024 रोजी सक्तीच्या भूसंपादनाची काढलेली अधिसूचना रद्दच करावी..
शक्तिपीठ महामार्ग 1955 च्या कायद्या प्रमाणे करणार असून जे 12 जिल्ह्यातील 389 गावातील गट नंबर जाहीर केले आहेत ते महामार्गासाठी अधिग्रहण केले असून त्या गट नंबर मधील क्षेत्राला शक्तिपीठ महामार्ग म्हणून घोषित केले असल्याचे महाराष्ट्र शासनाने राजपत्रात म्हणले आहे... हि अशी शासनाची एकाकी भूमिका अन्यायकारक आहे.. याच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती चे वतीने वतीने 12 जिल्ह्याचा दौरा 11 एप्रिल पासून करण्यात येत असून या मध्ये शेतकऱ्यांच्या वर शासनाकडून होत असलेल्या दडपशाही व अन्याया बाबत जनजागृती करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनी कुणाच्या हितासाठी शासन काढून घेण्याचा डाव आखत आहे.. तुटपुंजा मोबदला देवून कितीही दडपशाही केली तरी एक इंच पण न देण्या बाबत चर्चा अनेक बाधीत गावात दौऱ्या दरम्यान झाली.
शक्तिपीठ महामार्ग रद्दच करावा..जो कोणाही शेतकऱ्यांच्या हिताचा नाही अशी ठाम भूमिका अनेक बाधीत शेतकऱ्यांनी मांडली.
अधिसूचना काढल्या प्रमाणे जर कायद्याची भीती दाखवून सक्तीने भूसंपादन करणार असाल तर...आमच्या शेतकरी हिताच्या 22 मागण्या पूर्ण कराव्यात मगच महामार्गाचे स्वप्न पहावे .
त्यामधे बाधीत क्षेत्राला वर्धा ते सिंधुदुर्ग एकसमान सरसकट कमीत कमी एकरी दोन कोटी रुपये मोबदला व ज्या ठिकाणी एमआयडीसी झोन असेल तिथे कमीत कमी एकरी चार कोटी रुपये मोबदला व ज्या ठिकाणी या पेक्षा जास्तीचा दर आहे तिथे तिथल्या दरानुसार मोबदला देण्या बाबत बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबर त्यांच्या बांधावर जावून खाजगी वाटाघाटी कराव्यात त्यांची 100% सहमती घ्यावी त्यांचे संपूर्ण समाधान झाले नंतरच भूसंपादन करावे. अशी भूमिका नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती चे वतीने बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबर चर्चा करताना मांडण्यात आली त्यावेळी हजारो शेतकऱ्यांनी या दोन प्रमुख मागण्या बाबत मनमुराद चर्चा केली व सहमती दर्शविली..
जमिनी वाचवणेस काहीही करणेसाठी आम्ही तयार आहोत. आपल्या संघर्ष समिती बरोबर हा लढा जिंके पर्यंत ताकतीने लढणार असा निर्धार दौऱ्या दरम्यान सर्व शेतकऱ्यांनी बोलून दाखविला .तसेच तुटपुंजा मोबदला देवून सक्तीच्या भूसंपादनाचा महाराष्ट्र शासनाचा कुटील घाणेरडा डाव उलथवून टाकण्यासाठी आपली राज्यव्यापी आंदोलनाची दिशा.. सर्व बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबर झालेल्या संवादानुसार ,दौऱ्याच्या सांगता वेळी जाहीर करण्यात येईल .
दौऱ्याची सुरवात 11 एप्रील रोजी वर्धा जिल्ह्यातून करण्यात आली वर्धा जिल्हयातील वर्धा व देवळी तालुक्यातील 17 गावे तसेच 12 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यातील कळंब, यवतमाळ, घाटंजी,आर्णी, महागाव,उमरखेड तालुक्यातील 42 अशा विदर्भातील एकूण 59 गावातील बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करण्यात आला.
13 एप्रिल पासून मराठवाडा दौरा सुरू आहे..त्या मध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव व अर्धापूर तालुक्यातील 21 गावातील बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करण्यात आला. 14 एप्रिल रोजी हिंगोली जिल्हयातील कळमनुरी,वसमत, तालुक्यातील 19 गावातील बाधीत शेतकऱ्यांच्या बरोबर संवाद करण्यात आला. पुढे परभणी , बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधीत गावातील शेतकऱ्यांच्या बरोबर 21 एप्रिल पर्यंत दौरा चालणार आहे.. अशी माहिती शेतकरी कामगार पक्षाचे नेते व नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग बाधीत शेतकरी संघर्ष समिती चे राज्य समन्वयक भाई दिगंबर कांबळे यांनी दिली.. दौऱ्यात लढ्याचे सांगली जिल्हा समन्वयक घनशाम नलावडे, प्रा. राजू गोरडे, तुळशीराम पडोळे विष्णू सावंत , भूषण गुरव, सागर बिले, महेश बिले, गजानन सावंत, राहूल जमदाडे, शिवाजी शिंदे, अमर शिंदे, वामन कदम.सहभागी झाले आहेत .तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लढ्यात सहभागी होऊन लढा जिंके पर्यंत एकजुटीने संघर्ष करणार असल्याचे सांगितले.




No comments